मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची उद्या तातडीची बैठक

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची उद्या तातडीची बैठक

पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

  • Share this:

नव्वी दिल्ली 14 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलवली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला लष्कराच्या तीनही दल आणि गुप्तचर संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहे.

या हल्ल्यानंतर देशभर प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झालाय. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे.

हे बलिदान व्यर्थ जाणार नाही  असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केलीय. त्यानंतर दिल्लीत बैठकींना वेग आलाय. NSA अजित डोवाल 'खास' कामगिरीच्या तयारीसाठी लागले आहेत.

पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागलाय. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. उरीच्या हल्ल्यानंतरही देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आता काय कारवाई होते याची चर्चा सुरू झालीय.

उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. अजित डोवाल यांनी या कारवाईची आखणी केली होती. आताही अजित डोवाल सक्रिय झाले असून त्यांनी उच्चस्तरीय बैठकींना सुरुवातही केली आहे.

सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याने आता भारतीय लष्कर कसा बदला घेणार याची चर्चा सुरू झालीय. पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच याला जबाबदार आहे.

First published: February 14, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading