मराठी बातम्या /बातम्या /देश /

शेतीसाठीच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 1.5% व्याज सवलत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

शेतीसाठीच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 1.5% व्याज सवलत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्थां सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँक, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका यांना 1.5% व्याज अनुदान दिले जाईल.

  • Published by:  Pravin Wakchoure
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सवलत 1.5% वर देण्यास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे 2022-23 ते 2024 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्थांना ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँक, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका यांना 1.5% व्याज अनुदान दिले जाईल. यासाठी या योजनेअंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीसाठी 34,856 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदींची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील पुरेसा कर्जपुरवठा शेतीला मिळेल. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांचे आर्थिक आरोग्य सुधारल्याने ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासह सर्व कामांसाठी अल्प मुदतीचे कृषी कर्ज दिले जात असल्याने यामुळे रोजगार निर्मितीही होईल. केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली, ज्यामुळे त्यांना केव्हाही कर्जावर कृषी उत्पादने आणि इतर साहित्य खरेदी करता येते. शेतकरी बँकेला किमान व्याज दर देऊ शकतील याची खात्री करण्यासाठी, कमी व्याजदरासाठी, भारत सरकारने व्याज सवलत योजना (ISS) सुरू केली. शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देणे या योजनेचा उद्देश आहे.
First published:

Tags: Modi government

पुढील बातम्या