CAB विरोधी निदर्शनांना हिंसक वळण; पोलिसांबरोबरीच्या झटापटीत 2 आंदोलक ठार

CAB विरोधी निदर्शनांना हिंसक वळण; पोलिसांबरोबरीच्या झटापटीत 2 आंदोलक ठार

नागरिकता सुधारणा विधेयकाला (Citizenship amendment Bill) ईशान्य भारतातून होणारा विरोध (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली.

  • Share this:

गुवाहाटी, 12 डिसेंबर : नागरिकता सुधारणा कायदा (Citizenship amendment Bill)  संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला. आता या कायदा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालेला असतानाच ईशान्य भारतातून होणारा विरोध  (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय दोघेजण गंभीर जखमी आहेत. आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं की काल संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी लागू झालेली संचारबंदी (Curfew) अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली आहे. आसाममध्ये इंटरनेटही बंद करण्यात आलं आहे.

दिब्रुगढ जिल्ह्यात चबुआमध्ये भाजपचे आमदार विनोद हजारिका यांच्या घराला आग लावण्यात आली. नागरिकता विधेयकाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रस्त्यावरच्या गाड्याही पेटवून दिल्या. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांन पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली.

संबंधित - 'अमित शहा मुर्दाबाद'च्या घोषणा देत जाळल्या नागरिकत्व विधेयकाच्या प्रती

नारिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसण्यास सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या तिथली परिस्थिती बिघडली असून तणावाचं वातावरण आहे. आसाम, मणिपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली असून कोणताही मोठा हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. बुधवारी रात्रीपासून काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात वातावरण तापल्यामुळे पूर्वोत्तर भागांतील विमानसेवाही खंडित करण्यात आली आहे. इसजेट, विस्तारा, इंडिगो कंपन्यांनी आसामला जाणारी विमानं शुक्रवारपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला त्रिपूरा, मिझोराम, मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आसाममध्ये अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आसामच्या अतिरिक्त पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलं आहे.

अन्य बातम्या

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला दोन मोठे धक्के, उत्पादन दर पुन्हा घसरला

अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप; जाणून घ्या, कोणत्या पक्षाकडे कोणते खाते?

'समृद्धी महामार्ग' पूर्ण होण्याआधीच नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 12, 2019, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading