मराठी बातम्या /बातम्या /देश /

CAB : नागरिकत्व सुधारणा विधेयकाने नेमकं काय बदलेल? तुमच्या मनातल्या 12 प्रश्नांची उत्तरं

CAB : नागरिकत्व सुधारणा विधेयकाने नेमकं काय बदलेल? तुमच्या मनातल्या 12 प्रश्नांची उत्तरं

Citizenship Amendment Bill राज्यसभेत संमत झालं आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची वाट मोकळी झाली. हा कायदेबदल अस्तित्वात आल्याने नेमका काय फरक पडेल? तुमच्या मनातले 12 प्रश्न आणि त्याची उत्तरं...

Citizenship Amendment Bill राज्यसभेत संमत झालं आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची वाट मोकळी झाली. हा कायदेबदल अस्तित्वात आल्याने नेमका काय फरक पडेल? तुमच्या मनातले 12 प्रश्न आणि त्याची उत्तरं...

Citizenship Amendment Bill राज्यसभेत संमत झालं आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची वाट मोकळी झाली. हा कायदेबदल अस्तित्वात आल्याने नेमका काय फरक पडेल? तुमच्या मनातले 12 प्रश्न आणि त्याची उत्तरं...

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : Citizenship Amendment Bill राज्यसभेत संमत झालं आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची वाट मोकळी झाली. हा कायदेबदल अस्तित्वात आल्याने नेमका काय फरक पडेल? कुठल्या देशातल्या निर्वासितांसाठी हा कायदा उपयुक्त ठरेल आणि ईशान्य भारतात याला एवढा विरोध का होत आहे... यासारख्या तुमच्या मनातले 12 प्रश्न आणि त्याची उत्तरं... 1. CAB म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार तिबेटी निर्वासितांना नागरिकत्व मिळू शकतं का? NO : नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन व्यक्तींना नागरिकत्व मिळू शकतं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या देशातल्या ज्या व्यक्तींनी तिथल्या धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतर केलं आहे अशा सगळ्या व्यक्तींना नागरिकत्व मिळेल. हा कायदा तिबेटी निर्वासितांना लागू नाही. 2. या कायद्यानुसार पाकिस्तानमधून भारतात आलेल्या अहमदिया पंथाच्या व्यक्तींना नागरिकत्व मिळू शकतं का? NO : नागरिकत्व सुधारणा कायदा हा हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातल्या व्यक्तींसाठीच मर्यादित आहे. यामध्ये इस्लाममधल्या अहमदिया पंथासारख्या पंथांचा समावेश नाही. संंबंधित -  मोदी सरकारचा मोठा विजय, राज्यसभेत 'नागरिकत्व' विधेयक मंजूर 3. बांग्लादेशमधल्या एखाद्या हिंदू व्यक्तीने 2015 मध्ये भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केला असेल तर तिला CAB (Citizenship Amendment Bill) अंतर्गत नागरिकत्व मिळू शकतं का? NO : CAB हे विधेयक भारतात 31 डिसेंबर 2014 मध्ये आलेल्या व्यक्तींनाच लागू आहे. 4. एखाद्या बौद्ध व्यक्तीने बांग्लादेशमधून भारतात बेकायदा स्थलांतर केलं असेल आणि तिचं नाव आसाममधल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स मध्ये नसेल. त्याचबरोबर फॉरिनर्स ट्रिब्युनलमध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध खटला प्रलंबित असेल तरीही ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते का ? YES : एखाद्या व्यक्तीवर खटला दाखल झालेला असेल तरीही ती व्यक्ती नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते. 5. मेघालयाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये केला आहे. हे CAB च्या कक्षेबाहेर आहे. मग बांग्लादेशमधून एखाद्या हिंदू व्यक्तीने भारतात स्थलांतर केलं असेल आणि ती व्यक्ती मेघालयमध्ये शिलाँगच्या पोलिस बाजारमध्ये राहत असेल तर ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते का ? YES : मेघालयमधले बहुतांश नागरिक सहाव्या शेड्युलअंतर्गत येतात. शिलाँग सिटीमधले पोलीस बाजार, जेल रोड, युरोपियन वॉर्ड, कँटॉनमेंट एरिया हे भाग सहाव्या शेड्युलच्या बाहेर आहेत. 6. पाकिस्तानमधून आलेली एखादी बेकायदेशीर ख्रिश्चन स्थलांतरित व्यक्ती जर नागालँडमधल्या दिमापूरमध्ये राहत असेल तर ती व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकत नाही का? कारण  नागालँड हे इनर लाइन परमिटने संरक्षित आहे आणि ते CAB च्या कक्षेबाहेर आहे. NO : नागालँडमधल्या दिमापूरला इनर लाइन परमिट लागू नाही. 7. त्रिपुरामध्ये बेकायदेशीररित्या स्थायिक झालेली एखादी बंगाली हिंदू व्यक्ती असेल तर तिला CAB अंतर्गत नागरिकत्व मिळू शकतं का? NO :  त्रिपुरामधले जे आदिवासी भाग सहाव्या शेड्युलमधून वगळण्यात आलेत ते CAB च्या अंतर्गत येत नाहीत. त्यामुळे या भागात स्थायिक झालेले बेकायदेशीर स्थलांतरित CAB अंतर्गत नागरित्वासाठी अर्ज करू शकत नाहीत. त्याचबरोबर CAB साठी 31 डिसेंबर 2014 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. 8. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या देशांतून धार्मिक छळामुळे ज्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलं आहे त्यांना CAB नुसार आपोआप नागरिकत्व मिळेल का? NO :  भारतात 5 वर्षं स्थायिक झालेल्या किंवा 5 वर्षं सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाच नागरिकत्व मिळू शकेल. 9. भारतात आलेल्या कोणत्याही हिंदू स्थलांतरिताला CAB च्या अंतर्गत नागरिक्तव मिळू शकतं का? NO :  पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या देशांतून धार्मिक छळामुळे ज्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलं आहे त्यांनाच CAB लागू होतं. हे तीन देश सोडून अन्य देशांतून आलेल्या व्यक्तींना हे लागू होत नाही. 10. बांग्लादेशातून येऊन अरुणाचल प्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या चकमा आणि हॅजाँग निर्वासितांना अजून नागरिकत्व मिळालेलं नाही. असे लोक CAB अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात का ? NO :  चकमा हे बौद्ध आहेत आणि हॅजाँग हिंदू आहेत. धार्मिक छळाच्या कारणांमुळे ते बांग्लादेशातून भारतात आले असल्याने ते तांत्रिकदृष्ट्या यासाठी पात्र आहेत पण अरुणाचल प्रदेश हा इनर लाइन परमिटमुळे संरक्षित असल्याने तो CAB मधून वगळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळण्यात अडचणी येऊ शकतात. 11. श्रीलंकेतून भारतात आलेले हिंदू तामिळ लोक CAB अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात का? NO :  CAB हे फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन लोकांसाठीच लागू आहे. यामध्ये श्रीलंका किंवा आणखी देशांचा समावेश करण्यात आलेला नाही. 12. जी मूळ जोरहाटची आहे आणि ती आसामी बोलणारी हिंदू व्यक्ती आहे अशा व्यक्तीचं नाव नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये घेतलेलं नव्हतं. आता ती व्यक्ती CAB अंतर्गत अर्ज करू शकते का? NO :  CAB हे फक्त स्थलांतरितांसाठी आहे. काही कारणांमुळे ज्यांना NRC सारख्या यादीतून वगळण्यात आलं आहे अशा इथे मूळचे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ते लागू नाही. इतर संबंधित बातम्या 'भारताच्या इतिहासातला काळा दिवस' सोनियांची कडक शब्दांतली प्रतिक्रिया CAB 2019 : राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली? संजय राऊतांचा खुलासा CABला विरोध, महाराष्ट्रात IPS अधिकारी अब्दुर रहेमान यांचा राजीनामा
First published:

Tags: BJP

पुढील बातम्या