अमेरिकन नागरिकासाठी टॅक्सी चालकानं केली दिल्ली बंद, लुटले 90 हजार!

सणानिमित्त दिल्ली बंद असल्याचं सांगत टॅक्सी ड्रायव्हरने रिक्षावाल्याच्या मदतीने अमेरिकन नागरिकाला लुटल्याची घटना राजधानीत घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 01:12 PM IST

अमेरिकन नागरिकासाठी टॅक्सी चालकानं केली दिल्ली बंद, लुटले 90 हजार!

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : राजधानीत एका अमेरिकन नागरिकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. यात दिल्ली बंद असल्याचं सांगत अमेरिकन नागरिकाकडून तब्बल 90 हजार रुपये उकळले. 18 ऑक्टोबरला दिल्लीत आलेल्या जॉर्ज वानमीटरला एका टॅक्सी चालकाने सणांमुळे दिल्ली बंद असल्याचं सांगितलं. यावेळी त्यानं इतर काही ड्रायव्हर लोकांनाही साथीला घेतलं. टॅक्सी चालकाने जॉर्जला असं काही फसवलं की त्याने फिरण्याचं शेड्यूल बदललं.

जॉर्जने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं की, दिल्लीत आल्यानंतर त्याने एक टॅक्सी भाड्यानं घेतली. त्यावेळी पहाडगंज हॉटेलमध्ये जायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर चालकाने रस्त्यात असलेल्या पोलिस बॅरिकेडजवळ गाडी थांबवली आणि रस्ता बंद केला असल्याचं सांगितलं.

सण असल्यानं पुढचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत असं सांगून टॅक्सी ड्रायव्हर जॉर्जला कॅनॉट प्लेसमधील एका टूर एजन्सीत घेऊन गेला. त्यानंतर टूर एजन्सीने दिल्ली बंद असल्याचं सांगितलं. पहाडगंज हॉटेलकडे जाणारे रस्तेही बंद असल्याचं जॉर्जला सांगितलं.

टॅक्सी ड्रायव्हरच्या वागण्याचा संशय आल्यानं जॉर्जने रिक्षाने जाण्याचं ठरवलं. मात्र, तिथेही रिक्षा ड्रायव्हरने दिल्ली बंद असून कुठेही जाणार नाही असं सांगितलं. त्यानंतर रिक्षा ड्रायव्हरने जॉर्जला दुसऱ्या टूर एजन्सीत नेलं. तिथंही दिल्ली बंद असल्याचे त्याला सांगण्यात आले. शेवटी जॉर्जने जयपूर आणि आग्र्यात हॉटेल बूक केली. तिथं पैसे देऊन जॉर्ज आग्र्याला गेला.

आग्र्याला पोहचल्यानंतर जॉर्जने पहाडगंज हॉटेलमध्ये फोन केला. बुकींगचे पैसे परत मागितल्यावर त्याला सत्य समजले. हॉटेल कर्मचाऱ्याने त्याला दिल्ली बंद नसल्याचे सांगितले. तसेच सर्व रस्ते सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली. त्यानंतर जॉर्जने दिल्लीत येऊन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी टॅक्सी ड्रायव्हरला अटक केली आहे.

Loading...

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...