फाळणीच्या वादावर काँग्रेसचा अमित शहांवर पलटवार; 'सावरकरांनीच मांडला होता द्विराष्ट्रवाद'

फाळणीच्या वादावर काँग्रेसचा अमित शहांवर पलटवार; 'सावरकरांनीच मांडला होता द्विराष्ट्रवाद'

गृहमंत्री अमित शाहा यांनी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयक The Citizenship (Amendment) Bill (CAB) मांडताना धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करणारे काँग्रेसचेच नेते होते, असा दावा केला. सावरकरांचं नाव घेत काँग्रेसनं त्याला प्रत्युत्तर दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : गृहमंत्री अमित शाहा यांनी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयक The Citizenship (Amendment) Bill  (CAB) मांडताना धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करणारे काँग्रेसचेच नेते होते, असा दावा केला. याला उत्तर देताना काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी थेट फाळणीचं मूळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारात असल्याचं सांगत उत्तर दिलं.

सावरकांनीच सर्वप्रथम द्विराष्ट्रवाद मांडला होता, असं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी संसदेत केलं. "गृहमंत्री आज म्हणाले की, देशाच्या धर्माधारित फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार आहे. पण मला हे स्पष्ट करायचं आहे की, 1935 मध्ये सावरकरांनीच हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनात द्विराष्ट्रवाद संकल्पना मांडली होती. काँग्रेसने नव्हे", असं तिवारी यांनी सांगितलं.

लोकसभेत नागरित्व सुधारणा कायदा विधेयकावर चर्चा सुरू असताना तिवारी यांनी सावरकरांचं नाव घेत थेट आरोप केला. "देशात पहिल्यांदाच धर्माच्या आधारावर नागरिकत्व देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं सांगत काँग्रेसने या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे संविधानाच्या मूळ कल्पनेच्याच विरोधात आहे", असं ते म्हणाले.

संबंधित - अमित शहांच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते

ज्या आदर्शांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती केली, त्याला छेद देणारं हे विधायक आहे, असंही तिवारी म्हणाले.

तत्पूर्वी हे विधेयक संसदेत मांडण्याआधी अमित शहा यांनी धर्माधारित फाळणीसाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. त्याचं खंडन करण्यासाठी तिवारी यांनी हे उत्तर दिलं. या विधेयकाला विरोध करणारे या कायदा बदलामुळे भारताची धर्मनिरपेक्ष घटनाच संकटात येईल, असं म्हटलं आहे. कारण मुस्लिमांबाबत दुजाभाव केला जात आहे, असा त्यांचं म्हणणं आहे.

वाचा - कर्नाटकचा निकाल लागताच PM मोदींनी शिवसेनेवर साधला निशाणा

The Citizenship (Amendment) Bill अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झालं तर 60 वर्षं अस्तित्वात असलेला कायदा बदलेल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातल्या बिगर मुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळणं सोपं होईल. या तीन देशातल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांवर अत्याचार होत आहेत, असं शहा यांनी हे विधेयक संसदेत मांडण्याअगोरच्या भाषणात सांगितलं.

मनीष तिवारी यांच्याअगोदर शशी थरूर यांनीदेखील "धर्माधारित राष्ट्रनिर्मिती ही पाकिस्तानची कल्पना होती", असं सांगितलं.

भाजपने या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात CAB चा उल्लेख केला होता. नागरिकत्व कायदा बदलणार, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्याला अनुसरून त्यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं.

-------------------

अन्य बातम्या

शिवसेना झाली काँग्रेसची हमाल, दे धमाल; भाजप नेत्याचा घणाघात

अर्थव्यवस्था, मोदींचे मंत्रीमंडळ यावरून रघुराम राजन यांचा सरकारवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या