LIVE NOW

LIVE : 'भारताच्या इतिहासातला काळा दिवस' सोनियांची कडक शब्दांतली प्रतिक्रिया

मुंबई/नवी दिल्ली, 11 डिसेंबर : भाजप सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी विधेयक - Citizenship Amendment Bill (CAB) राज्यसभेत मांडण्यात येत आहे. त्यावर या वरीष्ठ सभागृहात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अद्याप खातेवाटप झालेलं नसल्याने ती उत्सुकता आहेच. त्यात भाजपमध्ये फूट पडणार, अशीही चर्चा सुरू आहे. दिवसभरात देशात आणि राज्यात घडत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स इथे LIVE पाहा..

Lokmat.news18.com | December 11, 2019, 9:07 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 11, 2019
auto-refresh

Highlights

7:05 pm (IST)

LIVE अमित शाहांनी उल्लेख केला 'जिन्नाजी' आणि...

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना अमित शाहा यांनी विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरं दिली. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे पहिले अध्यक्ष बॅरिस्टर जिन्नांचा उल्लेख जिन्नाजी असा केला आणि राज्यसभेत गदारोळ उठला.

"मी पार्लमेंटमध्ये उभा आहे आणि इथे भाषण करण्याची एक रीत आहे", असं म्हणत अमित शाहांनी भाषण सुरू ठेवलं. अमित शाहा म्हणाले, "सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचं मूळ पेरलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. मी त्याचं खंडन इथे करणार नाही. पण साऱ्या देशाला माहिती आहे, फाळणी कुणामुळे झाली. बॅरिस्टर जिन्नाजींनी हा फाळणीचा प्रस्ताव ठेवला. पण तत्कालीन काँग्रेसने तो प्रस्ताव स्वीकारलाच का?"

Load More