Ola - Uber होणार तिप्पट महाग, हे आहे कारण

Ola - Uber होणार तिप्पट महाग, हे आहे कारण

Ola - Uber सारख्या कंपन्यांनी सर्वाधिक मागणी असलेल्या वेळांना मागणी आणि पुरवढ्याच्या आधारे किंमती निश्चित करण्याची सुट देण्याची मागणी केली होती. त्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर :  केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. Cab Aggregators कंपन्यांना सर्वाधिक व्यस्त वेळेत बेसिक भाड्याच्या तिप्पट भाडं वसूल करण्याची परवानगी देणार आहे. हा निर्णय लागू झाला तर तुमच्या कामाच्या वेळेत या गाड्या बुक करणं महाग पडू शकतं. Ola - Uber सारख्या कंपन्यांनी सर्वाधिक मागणी असलेल्या वेळांना मागणी आणि पुरवढ्याच्या आधारे किंमती निश्चित करण्याची सुट देण्याची मागणी केली होती. त्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

या आधीच सकाळ आणि संध्याकाळी Ola - Uber मिळविण्यासाठी ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा दाम दुप्पट भाडं आकारलं जातं. त्यात हा नवा नियम लागू केला तर ग्राहकांची लूट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र हे भाडं किती वाढवावं यावर काही बंधणं घालण्याचीही शक्यता व्यक्त केलीय जातेय.

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकला, हायकोर्टात याचिका!

हे नवे नियम लागू करायचे की नाहीत याचा अधिकार हा राज्य सरकारला असणार आहे. अशा प्रकारचे काही बदल कर्नाटकमध्ये लागू झाले आहेत. मात्र नव्या नियमांच्या आधारे या कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडं आकारल्यास त्याचा ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता असून ग्राहकांचा असंतोष झाला चर या कंपन्यांनाही फटका बसू शकतो.

भारताचा आर्थिक विकास धीम्या गतीने

भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचं अनुमान इंटरनॅशनल माॅनेटरी फंड (IMF)- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी काढलं. त्यांनी सांगितलं की, काॅर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामक अनिश्चितता आणि नाॅन बँक आर्थिक कंपन्यांचा कमकुवतपणा यामुळे ही वाढ धीम्या गतीनं होतेय.

राष्ट्रवादीत जिंकले पण आता हरण्याची उदयनराजेंनाच भीती, 'ही' टाकली भाजपला अट?

जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2019 आणि 2020मधल्या भारताच्या आर्थिक वाढीचं भाकित केलंय. ही वाढ दोन्ही वर्षात  0.3 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यात पुढे म्हटलंय, GDP 7 आणि 7.2 टक्केच होणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा कमजोर झालीय.

PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात 'असे' मिळतील पैसे

पण वाॅशिंग्टनमधल्या ग्लोबल आर्थिक संस्थेनं सांगितलंय की, भारतात अर्थव्यवस्थेची वाढ जगापेक्षा जलद होईल. भारत चीनच्या खूप पुढे जाईल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस म्हणाले, 'भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर आहे. काॅर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामक अनिश्चितता आणि नाॅन बँक आर्थिक कंपन्यांचा कमकुवतपणा यामुळे ही वाढ धीम्या गतीनं होतेय.'

Published by: Ajay Kautikwar
First published: September 13, 2019, 9:46 PM IST

ताज्या बातम्या