CAA : आंदोलन करणाऱ्या जर्मन विद्यार्थ्याला दणका, सोडायला लावला भारत

CAA : आंदोलन करणाऱ्या जर्मन विद्यार्थ्याला दणका, सोडायला लावला भारत

आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण घेणाऱा जॅकब CAA आणि NRC विरोधात आंदालोनामध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर जॅकबला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले.

  • Share this:

बेंगळुरु, 24 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर आंदोलन झाले. या आंदोलनावेळी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर यावरून अनेक आरोप केले. आता नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केल्यामुळे एका जर्मन विद्यार्थ्याला भारत सोडून जाण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे. आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण घेणाऱा जॅकब CAA आणि NRC विरोधात आंदालोनामध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर जॅकबला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले.

भारतातून जर्मनीला परतण्याआधी चेन्नई विमानतळावर त्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने मला देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरुत होतो. एका क्रिडा स्पर्धेत सहभागी होता. तेव्हाच कार्यालयाकडून याबाबतचा मेल मिळाला.

जॅकब म्हणाला की, मी सोमवारी सकाळी चेन्नईत पोहचले तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मला लगेच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितलं. तेव्हा अधिकाऱ्यांनी मला भारता राहण्यासाठी परवानगी देण्यात काही अडचणी असल्याचं सांगितलं. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर माझ्या परवानगीला कोणतीही अडचण नसल्याचं लक्षात आलं. यानंतर मला राजकारण आणि मला काय आवडतं याबद्दल विचारलं. शेवटी सीएए आणि त्याविरोधातील आंदोलनातील सहभागाबद्दलही विचारण्यात आलं. तीन अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा झाली.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा संपल्यानंतर विद्यार्थी व्हिसा नियमांच उल्लंघन केल्याने तुम्हाला तात्काळ भारत सोडावा लागेलं असं मला सांगण्यात आलं. मी त्यांच्याकडे याबाबत लेखी पत्र मागितले तेव्हा पासपोर्ट माझ्याकडे देऊन देश सोडा असं सांगितलं. तसेच पत्र मिळेल असं म्हटले पण मिळालं नाही. यानंतर आयटी कॅम्पसमध्ये जाऊन साहित्य पॅक केलं. तिकीट काढलं आणि विमानतळाकडे आलो असंही जॅकबने सांगितलं.

वाचा : CAA, NRC मुद्दा तापला असतानाच मोदी सरकार NPRच्या तयारीत

Published by: Manoj Khandekar
First published: December 24, 2019, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading