Home /News /national /

पाहा VIDEO : CAA विरोधात आंदोलन करणारे इतिहासकार रामचंद्र गुहांना मुलाखत देतानाच नेलं ओढून

पाहा VIDEO : CAA विरोधात आंदोलन करणारे इतिहासकार रामचंद्र गुहांना मुलाखत देतानाच नेलं ओढून

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा बंगळुरूमध्ये एका न्यूज चॅनलला मुलाखत देत होते. ही मुलाखत सुरू असताना पोलिसांनी त्यांना खेचून धरून नेलं आणि अटक केली.

पुढे वाचा ...
    बंगळुरू, 19 डिसेंबर :नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोदी सरकारविरुद्ध देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा बंगळुरूमध्ये एका न्यूज चॅनलला मुलाखत देत होते. ही मुलाखत सुरू असताना पोलिसांनी त्यांना खेचून धरून नेलं आणि अटक केली. त्यांच्याबरोबरच्या अन्य आंदोलकांनाही अटक करण्यात आली. महात्मा गांधींचं पोस्टर हातात धरल्याबद्दल आणि राज्यघटनेवर भाष्य केल्याबद्दल मला अटक करण्यात आली, असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. पोलीस केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही शांतपणे निषेध नोंदवत होतो, आंदोलन करत होतो मग आमचं म्हणणं मांडण्याआधीच आम्हाला पोलिसांनी तिथून खेचून नेलं आणि एका बसमध्ये कोंबलं, असंही त्यांनी सांगितलं.नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. या कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये धार्मिक अत्याचारामुळे भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. (हेही वाचा : तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंय का? या कारणासाठी करावंच लागेल हे काम) हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन आणि जैन सुमदायातल्या स्थलांतरितांना या कायद्यामुळे नागरिकत्व मिळेल. पण हा कायदा मुस्लीमधर्मियांच्या विरोधात आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, अशी भूमिकाही आंदोलकांनी मांडलीय. याच कायद्याला तीव्र विरोध होत असल्यामुळे आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांतही आंदोलनाला हिंक वळण लागलंय. =========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Amit Shah, Modi sarkar

    पुढील बातम्या