CAA च्या विरोधात उत्तर प्रदेश पेटलं; अनेक शहरांमध्ये हिंसा, दिल्लीतही तणाव - पाहा VIDEO

CAA च्या विरोधात उत्तर प्रदेश पेटलं; अनेक शहरांमध्ये हिंसा, दिल्लीतही तणाव - पाहा VIDEO

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जमावाने पोलिसांसह सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचा सपाटा लावला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हिंसक आदोलन सुरू आहे.

  • Share this:

लखनौ, 20 डिसेंबर : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जमावाने पोलिसांसह सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचा सपाटा लावला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हिंसक आदोलन सुरू आहे. अनेक शहरांमध्ये हिंसा भडकली आहे. काल लखनौमध्ये हिंसेत एकाचा मृत्यू झाला होता. आता फिरोजाबाद, बुलंदशहर, गोरखपूर या शहरांमध्ये हिंसक जमावाने दगडफेक केली. काही ठिकाणी जाळपोळही झाली आहे.

शुक्रवारच्या नमाजासाठी एकत्र आलेल्यांनी आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली. थोड्याच वेळात जमाव हिंसक झाला आणि त्यांनी पोलिसांनी लक्ष्य केलं.

दिल्लीतही जामा मशीद परिसरात मोठा जनसमुदाय जमला आहे. याशिवाय सीलमपूर, जाफराबाद भागातही निदर्शकांनी रस्ते बंद केले आहेत. दिल्लीतली 7 मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आली आहेत.

संबंधित - बीडमध्ये बंदला गालबोट; छत्रपती शिवाजी महाराज चौकात दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज

उत्तर प्रदेशात गोरखपूर भागात पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली.

दिल्लीत जामा मशीद परिसरात प्रचंड जनसमुदाय जमल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यातच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना या परिसरात मोर्चा काढायची परवानगी नाकारण्यात आली होती. पण तरीही चंद्रशेखर आझाद यामध्ये सामील झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. पण त्याअगोदरच समर्थकांनी त्यांना दूर नेलं.

--------------------

अन्य बातम्या

LIVE : दिल्लीत तणाव; जामा मशीद परिसरात जोरदार निदर्शनं

उन्नाव बलात्कार प्रकरणात आमदार कुलदीप सिंग सेंगरला कोर्टाने सुनावली जन्मठेप

IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

नागपूरमधून अजित पवारांसाठी मोठी बातमी, सिंचन घोटाळ्यात पूर्णपणे क्लीनचिट

फडणवीस सरकारवर कॅगचे ताशेरे, 60 हजार कोटींचा ताळमेळ नाही!

First published: December 20, 2019, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading