CAA वरून योगी सरकारच्या हाय अलर्ट! 14 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद

CAA वरून योगी सरकारच्या हाय अलर्ट! 14 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आठवड्याभरापूर्वी उत्तर प्रदेशात हिंसक आंदोलनं करण्यात आली होती. या आधी जमावाकडून दगडफेक, जाळपोळ आणि आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला होता. लखनऊसह अनेक शहरांमध्ये हिंसक आंदोलनांमुळे मोठं नुकसान झालं होतं. आज शुक्रवार असल्याने अनेक मुस्लीम बांधव नमाज पठणासाठी एकत्र येतात. यावेळी एकत्र येऊन सीएए आणि एनसीआर विरोधात हिंसक प्रदर्शनं केली जाऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबत सोशल मीडियावर अनेक व्हायरल आणि हिंसा भडकवणारे मेसेज आणि व्हिडिओ येत असतात. त्याची शहानीशा न करता बऱ्याचवेळा एका मेसेज अथवा व्हिडिओमुळे जमाव संतप्त होतो आणि हिंसक आंदोलनाची ठिणगी पडते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विशेष म्हणजे 14 जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा काही काळासाठी खंडित करण्यात आली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलनं होत आहेत. 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान पाच जणांना मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतही जाळपोळ करण्यात आली होती. या कायद्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत NRC आणि CAA बद्दल माहिती देणारी प्रश्नोत्तरं PIB ने जारी केली होती. तर देशभऱातील हिंसक आंदोलनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.

19 डिसेंबर रोजी लखनऊमध्ये जवळपास हिंसक आंदोलनांमध्ये 20 दुचाकी, 10 कार आणि तीन बस आणि मीडिया ओबी व्हॅनची जाळपोळ करण्यात आली होती.

आतापर्यंत उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 400हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 124 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तर सोशल मीडियावरील 19409 पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. सूबे पोलीस ठाण्यात 93 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. 9372 ट्विटर आणि 181 यूट्यूब प्रोफाइल ब्लॉक करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 08:11 AM IST

ताज्या बातम्या