भाजपने शेअर केला डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना VIDEO, तासाभरात झाला VIRAL

भाजपने शेअर केला डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना VIDEO, तासाभरात झाला VIRAL

काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : नागरिकत्व कायद्याला विरोध करत देशभर आंदोलन होत आहे. या आंदोलनात काँग्रेससह इतर अनेक पक्ष सहभागी आहेत. यातच आता काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. मनमोहन सिंग यांनी 2003 मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ तासाभरता व्हायरल झाला आहे. यामध्ये मनमोहन सिंग बांगलादेशात धार्मिकतेवरून हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शरणार्थींसाठी सरकारने सहानुभीतीची भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

केंद्रात 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार होते. त्यावेली राज्यसभा सदस्य असलेले मनमोहनसिंग यांनी तत्कालिन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलाताना भाषण केलं होतं. ते म्हणाले होते की, मी शरणार्थींच्या समस्या तुमच्यासमोर मांडू इच्छितो. फाळणीनंतर शेजारी देश बांगलादेशमध्ये धार्मिकतेवरून नागरिकांचा छळ केला गेला. जर पीडित लोक आपल्या देशात येत असतील तर त्यांना आश्रय दिला पाहिजे. आपण तेवढी उदारता दाखवली पाहिजे. गांभीर्याने नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे पहावं असं मी उप पंतप्रधान यांचे लक्ष वेधायचे आहे.

धार्मिक आधारावर शरणार्थींना नागरिकत्व दिल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. इतर पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हा व्हिडिओ भाजपने समोर आणला आहे. आता मनमोहन सिंग यांच्या या व्हिडिओवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा एकमेकांवर टीका टीप्पणी होईल. भाजपने हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधासाठी देशात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. देशातील अनेक भागात बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. बिहारमधील दरभंगा आणि पटनामध्ये रेल्वे थांबवण्यात आल्या. दिल्लीत अनेक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. तर बेंगळुरूत जोरदार आंदोलन केलं जात आहे. अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वाचा : दिल्लीत CAA वरून तणाव, महामार्गावर 8 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading