नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी रस्ता रोखणाऱ्यांना हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम (CAA) विरुद्ध दिल्ली पोलिसांना 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. शाहिन बागनंतर झफरबाद आणि चांद बागमधील रस्ता बंद करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले कपिल मिश्रा म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी पुढच्या तीन दिवसांत रस्ता मोकळा करावा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर असेपर्यंत आम्ही येथून शांततेत जाऊ पण तीन दिवसानंतर जर रस्ते रिकामे झाले नाहीत तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांचंही ऐकणार नाही.
यावेळी कपिल मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'चे नारेदेखील लगावले. कपिल मिश्रा म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करणार्यांची इच्छा आहे की दिल्लीत आग लागली पाहिजे. त्यामुळे रस्ते अडवले जात असून दंगलीसारखे वातावरण तयार केले जात आहे. कपिल मिश्रा म्हणाले की, जफरबादला शाहिन बाग होऊ देणार नाही.
दिल्ली पुलिस को तीन दिन का अल्टीमेटम - जाफराबाद और चांद बाग की सड़कें खाली करवाइए इसके बाद हमें मत समझाइयेगा , हम आपकी भी नहीं सुनेंगे, सिर्फ तीन दिन@DelhiPolice pic.twitter.com/9ozTazMZew
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 23, 2020
शाहीन बागच्या धर्तीवर जाफराबाद व चांद बाग मधील रस्ते बंद
काल रात्री नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात शाहीन बागच्या धर्तीवर निषेध करणार्या महिलांनी झफरबाद आणि चांद बागमधील रस्तेही रोखले. यानंतर नागरिकता दुरुस्ती कायद्याचे समर्थक आणि कपिल मिश्रा रविवारी दुपारी समर्थकांसह रस्त्यावर उतरले. सीएए समर्थनातून प्रात्यक्षिक करत लोकांवर दगडफेक, अशांतता निर्माण झाली. रविवारी दुपारी कपिल मिश्रा आणि सीएए समर्थक प्रदर्शन करत असतांना काही लोकांचा जमाव मोजापूर चौकाजवळील रस्त्यावरुन बाहेर आला. या जमावाचे लक्ष्य भाजपा नेते कपिल मिश्रा आणि त्यांचे समर्थक होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ निषेध नोंदवणाऱ्या लोकांना दगडफेक करण्यात आली, तेव्हा चेंगराचेंगरीही झाली. लोक धावू लागले. चोख उत्तर म्हणून पुन्बा दगडफेकही करण्यात आली. सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करणार्या लोकांनी गोळीबारही केला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दागले अश्रुधुरांचे गोळे
यानंतर हा गोंधळ इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी मोठी दगडफेक सुरू झाली. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी दिल्ली पोलिसांना अश्रुधुराचे गोळे सोडावे लागले. दगडफेक केल्याच्या संशयावरून जमावाने एका माणसावर जोरदार हल्ला केला. या घटनेनंतर झफराबादसह संपूर्ण भागात तणाव वाढला, यामुळे सुरक्षा दलाची मोठी संख्या तैनात करण्यात आली आहे. झफराबाद, चांद बाग आणि मौजपूर भागातही निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.
निषेधामुळे हे रस्ते पूर्णपणे बंद आहेत
सीएएच्या निषेधामुळे शाहीन बाग-कालिंदी कुंज-सरिता विहार रोड, वजीराबाद-चांद बाग रोड आणि मौजपूर-जाफराबाद रोड बंद आहेत. हा निषेध पाहता झफराबाद व मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.