जमीयत उलेमा ए हिंदची CAAवरून अमित शहांना धमकी

जमीयत उलेमा ए हिंदची CAAवरून अमित शहांना धमकी

'CAA विधेयक हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे गरीब आणि मुस्लिमांच्या अधिकारांवर गदा येणार आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 22 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (CAA)सध्या देशभर असंतोष निर्माण झालाय. अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये निदर्शने होत असून त्यांना हिंसक वळण मिळालं आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. असं असताना पश्चिम बंगालचे मंत्री आणि जमीयत उलेमा-ए-हिंद चे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट धमकीच दिलीय. अमित शहा यांनी हे वादग्रस्त CAA विधेयक मागे घ्यावं. ते जोपर्यंत CAAमागे घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना कोलकत्यात पाय ठेवू देणार नाही असं चौधरी यांनी म्हटलं आहे. चौधरींच्या या धमकीमुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. चौधरी म्हणाले, CAA विधेयक हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे गरीब आणि मुस्लिमांच्या अधिकारांवर गदा येणार आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मागे घेतलं पाहिजे.

अमित शहा हे जर कोलकता भेटीवर येणार असतील तर त्यांना विमानतळाच्या बाहेरच पडू दिलं जाणार नाही असंही ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आधीच या विधेयकाला तीव्र विरोध केला असून पश्चिम बंगालमध्ये हे विधेयक लागू केलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

रामदास आठवलेंच्या कार्यक्रमात अचानक फडणवीसांची झाली एन्ट्री

दिल्लीतल्या सभेत पंतप्रधान काय म्हणाले?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या प्रचारसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'हे विधेयक पारित झाल्यानंतर विरोधक जनतेला भ्रमित करत आहेत. खोटं बोलत आहेत. जेव्हा दिल्लीतील कच्ची घरं आम्ही पक्की केली तेव्हा आम्ही कोणी कुठल्या धर्माचे आहे हे विचारले होते का ? काही पुरावे मागितले होते का?' असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच याच सभेत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.

'जे मुख्यमंत्री म्हणतात हा कायदा लागू करणार नाही, त्यांनी आपल्या मुख्य महाधिवक्त्यासोबत थोडी चर्चा करा. राज्य असे करू शकते की नाही हे विचारा. मुख्यमंत्री असं बोलून स्वतःचे हसे करून घेत आहेत,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी चक्क विमानात केलं आंदोलन, असा घडला प्रकार!

भाजप आमदाराने केला जमावबंदीच्या आदेशाचा भंग, गुन्हा दाखल

'विरोधक नागरिकत्व कायद्याच्या नावाने लोकांना फसवत आहेत. नागरिकत्व कायद्याचा विरोध करणारे लोक हिंसाचार माजवत आहेत. देशात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. मोदीचा पुतळा जाळा पण गरीबाची रिक्षा जाळू नका,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या सभेवेळी मैदानात उपस्थित लोकांनी दिल्ली पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Tags: Amit Shah
First Published: Dec 22, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading