Home /News /national /

BYJU’S यंग जीनिअस भारतभर शोध घेत आहे यंग प्रोडीजीजचा

BYJU’S यंग जीनिअस भारतभर शोध घेत आहे यंग प्रोडीजीजचा

विविध क्षेत्रातील छोट्या प्रतिभावंतांची प्रसिद्धी, मान्यता व प्रेरणा यांसाठी News18 चा उपक्रम

    मुंबई, 23 नोव्हेंबर : प्रतिभावंत हा शब्द ऐकला की सर्वात आधी आपल्या मनात काय येतं? तीक्ष्ण बुद्धी असलेली एखादी व्यक्ती? जगातल्या बारीकसारीक गोष्टींमधून बोध घेऊन त्याचे मोठ्या गोष्टींसाठी उपयोजन करू शकणारी व्यक्ती? आपल्या ध्येयावर विश्वास ठेवून अत्यंत आवडीने काम करणारी आणि अतिशय दृढ राहणारी व्यक्ती? की अशी व्यक्ती की जिच्यामध्ये हे सर्व तर आहेच पण त्याचबरोबर आपल्याला ज्ञात असलेले हे जग बदलण्याची क्षमता आहे? एक प्रतिभावंत म्हणजे ज्याच्यामध्ये वर उल्लेख केलेले सर्व गुण तर असतीलच पण चौकटीबाहेरचा विचार करण्याचे धाडसच अंगी असलेला नव्हे तर ती चौकट तोडून एक नवीन अधिक प्रगत अशी चौकट निर्माण करण्याची क्षमता असलेली व्यक्ती होय. अशा लोकांची बुद्धी एका वेगळ्या स्तरावर कार्य करते, त्यांचे बुद्ध्यांक वेगळ्या पातळीवर असू शकतात, आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असतो. जेव्हा असे प्रतिभावंत कार्यरत असतात, तेव्हा जगात प्रगती होते. तर आपण याच्या एक पाऊल पुढे का जाऊ नये? जर आपण उपलब्ध संसाधनांचा वापर करून अशा प्रतिभावंत अलौकिक व्यक्तींचा त्यांच्या बालपणीच शोध घेऊ शकलो, त्यांची काळजी घेतली, आणि कमी वयातच त्यांची प्रतिभा प्रकाशझोतात आणून त्यांच्या प्रतिभेला गती दिली तर आतापासून जग किती पुढे जाईल याची कल्पना करा. आणि अगदी हेच BYJU’S यंग जीनिअस – News18चा उपक्रम प्राप्त करू इच्छितो. यामध्ये काय काय समाविष्ट आहे हे पहा: जगातील सर्वांत मोठ्या एडटेक कंपन्यांपैकी एक असलेली BYJU’S संयुक्तपणे देशभरातील युवा प्रतिभावंतांसाठी, त्यांनी पुढे येऊन आपली प्रतिभा दाखवावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील एक मंच निर्माण करू इच्छिते. आपल्या माहितीतील एखादे बालक किंवा आपल्या स्वतःच्या मुलामध्ये कोणतीही अलौकिक प्रतिभा असेल किंवा समवयस्कांपेक्षा अधिक प्रगल्भ असेल, मग ते कोणत्याही क्षेत्रात असो, कला, क्रीडा, शैक्षणिक असो किंवा अन्य कोणतेही असो या उपक्रमात आपण सहभागी झाले पाहिजे. कोणत्याही क्षेत्र किंवा भागातील असो, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अद्वितीय यश मिळवणाऱ्या आणि आवडीने झोकून देऊन काम करणाऱ्या छोट्या मुलांचीच केवळ आम्हाला आवश्यकता आहे. ‘यंग जीनियस’ नावाचा हा उपक्रम म्हणजे अपवादात्मक उंच भरारी घेऊ शकणाऱ्या आणि अलौकिक बुद्धीमत्तेची लक्षणे असणाऱ्या मुलांच्या कथा सांगणारी news18 नेटवर्कची पहिलीच अभिनव कल्पना आहे. एकदा सर्व नोंदी झाल्या आणि शॉर्टलिस्टिंगची प्रक्रिया संपली की निवड झालेली मुले साप्ताहिक ऑन-एअर कार्यक्रमाचा एक भाग बनतील. शैक्षणिक, कला, तंत्रज्ञान, खेळ, व्यवसाय व यासारख्या विविध क्षेत्रांमधून या न्यूज नेटवर्कच्या संपादकीय संघाने निवड केलेल्या भावी प्रतिभावंत बनू शकणाऱ्या छोट्या मुलांवर प्रकाश टाकतो. जर यामुळे कोणत्याही प्रकारे जिज्ञासा जागृत झाली आणि यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण झाली, तर https://www.news18.com/younggenius/ ला भेट देऊन तुमच्या मुलाच्या अलौकिक प्रतिभेची कथा आम्हाला सांगा किंवा BYJU’S अॅप डाऊनलोड करा आणि ‘यंग जीनिअस’ विभागाला भेट द्या. तुमच्या मुलांची प्रतिभा उजेडात आणा! #BYJUSयंगजीनिअस ही भागीदारीची पोस्ट आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या