फक्त १२ रुपये महिना देऊन मिळवा २ लाखांचा विमा

फक्त १२ रुपये महिना देऊन मिळवा २ लाखांचा विमा

हा विमा घेऊन आयुष्यभरासाठी तुम्ही आणि तुमचं कुटुंब व्हा टेंशन फ्री

  • Share this:

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर २०१८- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. या विमा योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतील. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत जीवन विमाचा फायदा पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने ही योजना लागू ९ मे २०१५ पासून सुरू केली आहे.

टर्म प्लॅन म्हणजे काय-

कोणत्याही विमा कंपनीच्या टर्म प्लॅनचा अर्थ म्हणजे यात कोणतीही जोखीम नाही. टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी उरलेल्या काळातील रक्कम भरते. तसेच जर पॉलिसीधारक व्यक्ती विमाचा कालावधी संपल्यानंतरही जीवंत असेल तर मात्र या विम्याचे पैसे मिळत नाहीत. टर्म प्लॅन कमीत कमी प्रिमियमवर सुरक्षा उपलब्ध करण्याचे माध्यम आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे वैशिष्ट्य काय-

या योजनेत विमा घेण्यासाठी कोणत्याही मेडिकल चाचणीची गरज नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी वय १८ वर्ष तर जास्तीत जास्त वय ५० वर्ष आहे. तसेच मॅच्युरिटी वयाच्या ५५ व्या वर्षी मिळेल.

योजनेअंतर्गत टर्म प्लॅनला दरवर्षी रिन्यू करावं लागतं. या योजनेत कुटुंबाला मिळणारी पक्की रक्कम ही २ लाख रुपये आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वर्षभरात फक्त ३३० रुपयांचा प्रिमियम भरायचा आहे. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे घेतली जाणार. या योजनेवर जीएसटी लागू होते

मृत्यू झाल्यास २ लाख रुपये मिळणार-

या विमाची मॅच्युरिटी होण्याआधी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील नॉमिनीला २ लाख रुपये दिले जाणार. या योजनेअंतर्गंत दिली जाणारी रक्कम ही २ लाखांपेक्षा जास्त किंवा कमी दिली जाणार नाही.

१ वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी घेतली जाते पॉलिसी

कोणतीही व्यक्ती या विमाचा फायदा एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी घेऊ शकते. कोणत्या व्यक्तीने मोठ्या कालावधीसाठी विमा योजना स्वीकारली आहे तर त्यांची बँक दरवर्षी प्रिमियमची रक्कम सेव्हिंग अकाऊंटमधून कापणार.

पॉलिसी कोणत्याही तारखेला विकत घेतली असली तरी त्याचे कवरेज पुढच्या वर्षी ३१ मे या तारखेलाच होणार.

पुढील वर्षांसाठी या योजनेच्या कवरला दरवर्षी १ जूनला बँकेतील खात्यातून डेबिट केले जाते.

इथे मिळेल या विम्याचे फॉर्म

या योजनेसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये फॉर्म उपलब्ध आहेत. यात इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिसा, तेलगू आणि तामिळ भाषांचा समावेश आहे. तसेच यासंबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही http://jansuraksha.gov.in/

First Published: Oct 13, 2018 07:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading