मेघालयात काँग्रेस विजयी, दोन लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर

मेघालयात काँग्रेस विजयी, दोन लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर

  • Share this:

मेघालय, 31 मे : मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवलाय. काँग्रेसचे उमेदवार मियानी डी शिरा यांनी एनपीपीचे उमेदवार     क्लेमेंट जी मोमिन यांना पराभूत केलंय. चार लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने दोन जागेवर आघाडी घेतलीये तर दोन जागी मागे आहे.

भंडारा गोंदिया, उत्तरप्रदेशमधील कैराना, नागालँड आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. पालघर वगळता भाजपला या दोन ठिकाणी मतदारांनी नाकारलं असल्याचं चित्र आहे. उत्तरप्रदेशमधील कैरानामध्ये आरएलडीचे उमेदवार तबस्सुम हसन यांनी भक्कम आघाडी घेतलीये. तर भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे आघाडीवर आहे. तर नागालँडमध्ये भाजप समर्थक एनडीपीपीचे उमेदवार तोखेहो आघाडीवर आहे. तर भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पालघर पोटनिवडणुकीत आघाडी मिळालीये.

विशेष म्हणजे भंडारा गोंदिया, उत्तरप्रदेशमधील कैराना दोन्ही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी आपला गड कायम राखत भाजपला रोखले आहे.

अंपाती, मेघालय (विधानसभा) मेघालयातल्या गारो हिल्स जिल्ह्यात हा मतदारसंघ येतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मुकूल संगमा यांनी अंपाती आणि सोंगसाक या दोन विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यापैकी सोंगसाक ही जागा ठेवून त्यांनी अंपाती मधून राजीनामा दिला होता. संगमा हे मेघालयाचे मुख्यमंत्री आहेत.

नागालँड (लोकसभा) नागालँड हा छोट्याश्या राज्यातला एकमेव लोकसभा मतदारसंघ. १९६७ मध्ये इथं पहिल्यांदा निवडणूक झाली होती. नेफीयू रिओ यांच्या राजीनाम्यामुळं इथं पोटनिवडणूक होते आहे. रिओ हे सध्या नागालँडचे मुख्यमंत्री आहेत. साठ विधानसभा मतदार संघाचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

भंडारा-गोंदिया भाजपचे नाना पटोले यांनी सरकारविरोधात बंड पुकारत खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांचा पराभव करत पटोलेंनी २०१४ मध्ये ही जागा पटकावली होती. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्याने नाना पटोलेंनी प्रयत्न करूनही काँग्रेसला उमेदवार देता आला नाही. इथं भाजपचे हेमंत पटले, राष्ट्रवादीचे मधूकर कुकडे आणि भारिपचे एल.के मडावी यांच्यात सामना रंगणार आहे. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया हे सहा विधासभा मतदार संघ या लोकसभा मतदार संघात येतात.

पालघर, महाराष्ट्र (लोकसभा) भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक होतेय. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली आहे. बहुजन विकास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिलीय. दामू शिंगडा हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. २००८ च्या फेररचनेत हा मतदार संघ तयार झाला. पालघर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात – डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई.

First published: May 31, 2018, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading