14 जागांचे अंतिम निकाल जाहीर, भाजपचा 2 जागांवर विजय

14 जागांचे अंतिम निकाल जाहीर, भाजपचा 2 जागांवर विजय

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या पोटनिवडणुकांमध्ये पालघर वगळता इतर कोणत्याही जागी भाजप आपला गड राखू शकला नाही.

  • Share this:

मुंबई, ता. 31 मे : आज 4 लोकसभा आणि 10 विधानसभा पोटनिवडणुकांचा निकाल आहे. दरम्यान, या सर्व जागांचा अंतिम निकाल लागला आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या पोटनिवडणुकांमध्ये पालघर आणि उत्तराखंड वगळता इतर कोणत्याही जागी भाजप आपला गड राखू शकला नाही. बरं इतकंच नाही तर भंडारा-गोंदियातही भाजपचा दारुण पराभव झाला आहे.

आतापर्यंत कोणत्या जागांचे निकाल लागले आहेत पाहुयात...

- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना मागे टाकत भाजपच्या राजेंद्र गावित यांचा विजय

- भंडारा-गोंदियामध्ये लोकसभा पोटनिवडणुकांत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांचा विजय. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा दारुण पराभन.

- कर्नाटकच्या राजराजेश्वरी नगरमध्ये काँग्रेसच्या मुनिरत्न यांचा 41162 मतांनी विजय.

- उत्तर प्रदेशच्या नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांचा 6211 मतांनी विजय

- बिहारच्या जोकीहाटमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीचे आरजेडी यांचा 76002 मतांनी विजय तर जेडीयूच्या पारड्यात 37913 मतं

- मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय. काँग्रेसचे उमेदवार मियानी डी शिरा यांनी एनपीपीचे उमेदवार क्लेमेंट जी मोमिन यांना केलं पराभूत

- केरळच्या चेंगान्नुर विधानसभा पोटनिवडणुकीत सीपीआईएम उमेदवार साजी चेरियन यांचा 20956 मतांनी विजयी

- झारखंडमध्ये सिल्ली विधानसभा पोटनिवडणुकांमधून जेएमएमच्या सीमा देवी यांचा विजय. आजसूच्या सुदेश महतो यांचा पराभव.

- झारखंड मुक्ति मोर्चाच्या उमेदवार बबिता महतो यांचा झारखंडच्या गोमियामध्ये 1344 मतांनी विजय. भाजपच्या माघवलाल सिंह यांचा केला पराभव

- पंजाबच्या शाहकोट विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार हरदेव सिंह यांनी मारली बाजी. 38802 मतांनी शिरोमणि अकाली दलच्या नायब सिंह यांचा केला पराभव

- भाजपने उत्तराखंडच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आपला झेंडा रोवला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा हा पहिला विजय आहे.

- पश्चिम बंगालच्या महेशतला विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दुलाल चंद्र दास यांचा विजय.

- उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन यांचा विजय. भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांचा 50,000 मतांनी केला पराभव

- नागालँड राज्याच्या लोकसभा निवडणुकांचे अंतिम निकाल हाती लागले आहेत. नागालँडमध्ये एनपीएफ विजयी ठरला आहे. एनपीएफचे उमेदवार सी अपोक जमीर यांनी 392827 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी एनडीपीपीच्या तोखेहो यांचा पराभव केला आहे.

लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येणाऱ्या या निवडणुकांनंतर भाजपची काय रणनीती असणार आहे, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

First published: May 31, 2018, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading