मराठी बातम्या /बातम्या /देश /

Railway Ticket Booking : गुगल सर्चवर बुकिंग करता येणार रेल्वेचं तिकीट; काय आहे ही भानगड? जाणून घ्या

Railway Ticket Booking : गुगल सर्चवर बुकिंग करता येणार रेल्वेचं तिकीट; काय आहे ही भानगड? जाणून घ्या

 येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. काय आहे ही भानगड? जाणून घ्या

येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. काय आहे ही भानगड? जाणून घ्या

येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. काय आहे ही भानगड? जाणून घ्या

मुंबई, 22 सप्टेंबर:  गुगलने एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या माध्यमातून निवडक देशांमधले युझर्स केवळ सर्चद्वारे रेल्वेचं तिकीट बुक करू शकणार आहेत. सध्या ही सुविधा फक्त काही देशांमध्ये लॉंच केली जाणार आहे; पण या सुविधेचा विस्तार करण्यासाठी कंपनीनं योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. गुगलने आता जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानमधल्या युझर्सना निवडक देशांमध्ये, तसंच जवळपास प्रवास करण्यासाठी थेट गुगल सर्चवर रेल्वे तिकीट बुकिंग करण्याचा एक सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आम्ही आमच्या प्रवास साधनांमध्ये सस्टेनॅबिलिटीचा समावेश केला आहे, असं गुगलतर्फे सांगण्यात आलं. काही ठराविक प्रवासासाठी रेल्वे हा चांगला पर्याय असू शकतो; पण ए पासून बी ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी दर आणि वेळापत्रक जाणून घेण्याकरिता काही वेळा वेगळं सर्च करावं लागू शकतं, असं गुगल कंपनीचे ट्रॅव्हल प्रॉडक्टचे उपाध्यक्ष रिचर्ड होल्डन यांनी सांगितलं. मंगळवारी (20 सप्टेंबर) रात्री उशिरा लिहिलेल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, आजपासून तुम्ही थेट गुगल सर्चवर रेल्वेचं तिकीट खरेदी करू शकता. विशेषतः जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानसह निवडक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी. हेही वाचा - Drink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम केवळ सर्च करा तुमच्यासाठी सर्वोत्तम ट्रेन तुम्हाला रेल्वेबाबत फक्त सर्च करायचं आहे. उदाहरणार्थ, बर्लिन ते व्हियाना ट्रेन. यानंतर तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये एक नवीन मॉड्युल दिसेल. त्यात तुम्हाला तुमची प्रवासाला निघण्याची तारीख निवडण्याचा ऑप्शन मिळेल आणि उपलब्ध ऑप्शन्सची तुलनादेखील करता येईल. एकदा तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली ट्रेन निवडली की त्यानंतर तुमचं बुकिंग पूर्ण करण्यासाठी भागीदाराच्या वेबसाइटवर जाण्यासाठी थेट लिंक दिली जाईल. बसेससाठीदेखील येणार अशी सुविधा होल्डन यांनी सांगितलं, जसजसं आम्ही इतर रेल्वे सेवा देणाऱ्या संस्थांशी जोडले जाऊ, तसा या सुविधेचा विस्तार अन्य ठिकाणी होत जाईल. आम्ही नजीकच्या भविष्यात बसच्या तिकिटांसाठीही अशाच सुविधेची चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून इंटरसिटी प्रवासासाठी जास्त पर्याय उपलब्ध होतील. तसंच विमान आणि हॉटेल्स या दोन्हींसाठी नवीन फिल्टरसह गुगल सर्चवर अधिक कायमस्वरूपी ऑप्शन शोधणंदेखील सोपं आहे. गुगलची ही नवी योजना प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. खासकरून भारतातल्या प्रवाशांना ही सुविधा नक्कीच उपयोगी पडेल. भारतात लोहमार्गाचं जाळं मोठं आहे. लांबच्या प्रवासासाठी भारतातले प्रवासी रेल्वेचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा गुगल सर्चवर उपलब्ध झाली, तर ती भारतीय नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल.
First published:

Tags: Google

पुढील बातम्या