दिवाळीच्या आधीच करा सोनं खरेदीचा विचार; वाढणार आहेत किमती!

दिवाळीच्या आधीच करा सोनं खरेदीचा विचार; वाढणार आहेत किमती!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव पुढील काही महिन्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव पुढील काही महिन्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. न्यूयॉर्कमधील बाजारपेठेत सोन्याचे दर 1 हजार 402 डॉलर तर चांदीचे दर 15.63 डॉलरवर पोहोचले आहेत. दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 35 हजार 500 ते 35 हजार 330 रुपयांवर पोहोचले आहेत.

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असण्याची शक्यता मुंबईतील सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे. दिवाळीपर्यंत सोने 38 हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 45 हजारावर पोहोचू शकतात.

आज खरेदी करू नका

दिवाळीपर्यंत सोन्याचे दर वाढण्याचे संकेत मिळत असले तरी आज (शुक्रवार) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 36 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात इतकी दर वाढ झाली नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सोन्याची खरेदी फायद्याची ठरू शकते.

पाणी मागताच ग्रामसेवकानं दाखवलं पिस्तूल; VIDEO व्हायरल

Tags: Gold prize
First Published: Jul 19, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading