केवळ 1 रूपयामध्ये खरेदी करा सोनं; अक्षय तृतीयासाठी जबरदस्त ऑफर

केवळ 1 रूपयामध्ये खरेदी करा सोनं; अक्षय तृतीयासाठी जबरदस्त ऑफर

पेटीएमच्या माध्यमातून केवळ 1 रूपयामध्ये सोनं खरेदी करणं शक्य आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त! साडेतीन मुहर्तांपैकी एक म्हणून देखील या मुहूर्ताकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक सोनं खरेदीला देखील प्राधान्य देतात. या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास घरी संपन्नता येते असा देखील लोकांचा विश्वास आहे. पण, पैसे कमी असल्यानं अनेकजण या दिवशी सोनं खरेदी करू शकत नाहीत. पण, आता केवळ एक रूपयामध्य़े तुम्ही सोनं खरेदी करू शकणार आहात. तुमचा विश्वास नाही ना बसत? पण, हो केवळ एक रूपयामध्ये सोनं खरेदी करणं तुम्हाला शक्य आहे. पेटीएम द्वारे तुम्हाला केवळ एक रूपयामध्ये सोनं खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुमची अक्षय तृतीया आनंदात जाऊ शकते.

पेटीएमनं 1 रूपयामध्ये सोनं खरेदीची योजना सुरू केली आहे. तुम्ही 1 रूपयापासून ते 1.50 लाख रूपयापर्यंत सोनं खरेदी करू शकता. तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं हे 24 कॅरेटचं असणार असा दावा कंपनीनं केला आहे. तुम्ही खरेदी केलेलं सोनं लॉकरमध्ये ठेवलं जाणार आहे. ज्यावेळी तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही सोनं घरी घेऊन जाऊ शकता.


वीकेण्डला घराबाहेर पडू नका, हा आहे हवामान खात्याचा अंदाज

पेटीएमद्वारे कसं खरेदी करणार सोनं?

पेटीएस अ‍ॅपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गोल्ड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सोन्याची खरेदी केल्यानंतर तुमचं सोनं MATC – PMP या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. खरेदी केल्यानंतर तुम्ही सोनं विकू देखील शकता.

पेटीएम सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के हमी घेते. किमान 1 ग्रॅम सोनं तुमच्या घरी सुरक्षित पोहोचवलं जातं. यामध्ये 1, 2, 5, 10 आणि 20 ग्रॅम सोन्याचे सिक्के असतात. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो.

बुलियन इंडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही सोनं खरेदी करू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला किमान 300 रूपयाचं सोनं खरेदी करावं लागेल. बुलियन इंडियाच्या माध्यमातून खरेदी केलेलं सोनं देखील MATC – PMP लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जातं. शिवाय, तुम्हाला हवं त्या दिवशी तुम्हाच्या घरी सोनं पोहोचवलं जातं.


VIDEO : पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या, घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 09:06 AM IST

ताज्या बातम्या