नवी दिल्ली, 2 जानेवारी : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री बुट सिंग (Buta Singh) यांचं शनिवारी सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. ANI या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे.
Former Union Minister, former MP from Rajasthan and Congress leader Buta Singh passes away.
— ANI (@ANI) January 2, 2021
पंजाबमध्ये जन्म, आठ वेळा खासदार
पंजाबमधील (Punjab) जालंधर जिल्ह्यात बुटा सिंग यांचा जन्म झाला. दलित नेता अशी त्यांची ओळख होती. ते तब्बल 8 वेळा लोकसभा खासदार होते पंजाबमधील अकाली दल (Alkali Dal) पक्षाकडून पहिली निवडणूक लढवणाऱ्या बुटा सिंग यांनी 1960 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1962 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले. त्यांनी राजकीय कारकीर्दीमध्ये वेगवगळी पदं भुषवली. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मंत्रिमंडळात ते सुरुवातीला कृषीमंत्री (1984 ते 1986) आणि नंतर गृहमंत्री (1986 ते 1989 ) होते. त्याचबरोबर बुटा सिंग 2004 ते 2006 या काळात बिहारचे राज्यपाल होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात (2007 ते 2010) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Shri Buta Singh Ji was an experienced administrator and effective voice for the welfare of the poor as well as downtrodden. Saddened by his passing away. My condolences to his family and supporters.
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2021
सरदार बूटा सिंह जी के देहांत से देश ने एक सच्चा जनसेवक और निष्ठावान नेता खो दिया है।
उन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा और जनता की भलाई के लिए समर्पित कर दिया, जिसके लिए उन्हें सदैव याद रखा जाएगा। इस मुश्किल समय में उनके परिवारजनों को मेरी संवेदनाएँ। — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2021
“श्री बुटा सिंग जी गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी एक अनुभवी प्रशासक आणि प्रभावी आवाज होते. त्यांच्या निधनानं मी दु:खी आहे. त्यांचा परिवार आणि समर्थकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.’’ तर, ‘देशानं एक सच्चा लोकसेवक आणि निष्ठावंत नेता गमावला’, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.