आनंद महिंद्रांनी US election बद्दल ट्विटरवर घेतला पोल; यूजर्सनी काय भन्नाट रिप्लाय दिलेत पाहा

आनंद महिंद्रांनी US election बद्दल ट्विटरवर घेतला पोल; यूजर्सनी काय भन्नाट रिप्लाय दिलेत पाहा

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालाबद्दल एक ट्वीट केलं. त्यावर एका युझरने जे उत्तर दिलं ते वाचून तुम्हालाही हसायला येईल.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: उद्योगपती आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर काहीतरी कॉमेंट्स करायला नेटकऱ्यांना नेहमीच मजा येते. कारण त्यांची ट्विट्सही तशीच अफलातून असतात.अमेरिकेतील निवडणुकीच्या एक्झिट पोलवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. आनंद महिंद्रा लिहितात, “आज रात्री कळेलच की कोणाची भविष्यवाणी खरी होणार आहे." त्यांच्या या ट्वीटवर एका युझरने त्यांना सल्ला दिला की, “तुम्ही तुमची ड्रीम 11ची टीम बनवा”

महिंद्रा यांनी ट्वीट केलं होतं की, “निवडणुकीच्या आकड्यावरुन सध्यातरी असं वाटतंय की ट्रम्प जिंकतील. पण अंतिम निर्णय येण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.“ तेव्हा उसामा खान नावाच्या एका युझरने त्यांना सल्ला दिला की, “सर कोण जिंकेल आणि कोण हरेल याचा विचार मी करतो.तोपर्यंत तुम्ही ड्रीम 11ची टीम बनवा. ” ट्वीटर युझरचं हे भन्नाट उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर एका युझरने लिहिलं की, “भारतीय लोक अमेरिकेत मतदान करणार नाहीत. त्यामुळे या निवडणुकीबद्दल आपण मत देऊन काहीही उपयोग नाही.”

आनंद महिंद्रा नेहमीच काहीतरी हटके ट्वीट्स करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं ट्वीटही चर्चेत आलं होतं. इंतसार आलम नावाच्या एका माणसाने आपल्या घराच्या छतावर स्कॉर्पिओ कारच्या डिझाईनची पाण्याची टाकी बांधली होती. ती पाण्याची टाकी हुबेहून स्कॉर्पिओ गाडीसारखी वाटत होती. आनंद महिंद्रा यांनी या माणसाच्या अचाट कल्पनेचं कौतुक केलं होतं.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 4, 2020, 3:53 PM IST
Tags: twitter

ताज्या बातम्या