खूशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 60 हजार कोटी, रक्कम न आल्यास अशी घ्या माहिती

खूशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 60 हजार कोटी, रक्कम न आल्यास अशी घ्या माहिती

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून रोखरक्कम जमा केली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14ऑक्टोबर : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून रोखरक्कम जमा केली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme)आतापर्यंत देशातील 7.45 कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात आला आहे. पण यापैकी केवळ 2.99 कोटी लोकांनाच या योजनेचा तिसरा हप्ता मिळला. देशातील 11.5 कोटी शेतकऱ्यांना अद्याप अंतिम टप्प्यातील निधी मिळालेला नाही. उर्वरित शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिसपर्यंत निधी पोहोचण्याचा प्रयत्न केंद्रीय कृषि मंत्रालय केला जात आहे. केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यानुसार,'आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याच्या स्वरुपात 27 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे'. पुढील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 60 हजार कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 14.5 कोटी शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील रक्कम पोहोचवण्यासाठी 87 हजार कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. पण काही शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक न करण्यात आल्यानं रक्कम जमा होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ही अडचण पाहता सरकारनं 30 नोव्हेंबरपर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे. ही प्रक्रिया होईपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रोखरक्कम जमादेखील होईल.

(वाचा :SBI च्या ग्राहकांना दुहेरी झटका, होमलोनसाठी द्यावी लागणार एवढी फी)

एकूण14.5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. सुरुवातीला छोट्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत आणण्यात आलं, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाच हेक्टेर जमीन होती, त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. यासाठी निधीचा बजेट 75 हजार कोटींहून वाढवून 87 हजार कोटी रुपये करण्यात आला होता.

(वाचा : दरमहा 5 हजारांच्या गुंतवणूकीवर मिळवा 45 लाख, सोबत मिळणार 22 हजारांची पेन्शन)

रक्कम खात्यात आली नाही, तर काय करावे?

जर तुमच्या बँक खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम पोहोचली नाही तर सर्वात आधी आपल्या महसूल अधिकारी (लेखपाल) आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधा. तेथेही तुम्हाला मदत न मिळाल्यास सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम किसान हेल्प डेस्क(PM-KISAN Help Desk)च्या ई-मेल Email (pmkisan-ict@gov.in)द्वारे तुम्ही संपर्क करू शकता. या पर्यायाद्वारेही तुम्हाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास 011-23381092 (Direct HelpLine) या क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेच्या वेलफेअर सेक्शन (Farmer's Welfare Section)मध्येही तुम्ही संपर्क करू शकता.

011-23382401 हा दिल्लीतील फोन क्रमांक तर (pmkisan-hqrs@gov.in) ई-मेल आयडी आहे.

(वाचा :SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात, 220 जण दिवाळखोरीत)

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या