दारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड

दारू पिऊन गाडी चालवली तर आता भरावा लागेल 'एवढा' रुपये दंड

Mmotor Vehicles Amendment Bill 2019 : दारू पिऊन वाहन चालवत असाल तर आता तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : दारू पिऊन वाहन चालवत असाल तर आता तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भातील सुधारित मोटर वाहन कायदा विधेयक (Motor Vehicle Act) सोमवारी (15 जुलै) लोकसभेत सादर केलं. या विधेयकात रस्ते वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नियमांना अधिक कठोर करण्यात आलं आहे. शिवाय, वाहन चालवताना थोडासाही निष्काळजीपणा दिसून आला तर जवळपास दहापट दंड भरावा लागू शकता, असा प्रस्तवाही ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी शासनानं कायदा अधिक कठोर केला आहे. यानुसार, दारू पिऊन गाडी चालवल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

(पाहा :VIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम)

नवीन विधेयकानुसार सर्व राज्यांमध्ये वाहन चालक परवाना (Uniform Driving License)आणि वाहन नोंदणी प्रक्रियांची ऑनलाइन नॅशनल रजिस्टरमध्ये समावेश करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत बोलताना गडकरी यांनी सांगितले की,'वाहतुकीच्या नियमांसंदर्भात कायदा करण्याचा अधिकार केंद्र तसंच राज्य सरकारलाही आहे. ज्या राज्यांना हा कायदा लागू करायचा आहे त्यांनी तो करावा, यासाठी कोणतेही बंधन नाही. संबंधित विधेयक यापूर्वीही संसदेत आणून मंजूर करण्यात आलं होतं. त्यामुळे यावरील चर्चेसाठी मी तयार आहे. 18 राज्यांतील परिवहन मंत्र्यांच्या मंजुरीनंतर हे विधेयक तयार करण्यात आलं आहे. स्टँडिंग कमिटीनंही यावर विचारविनिमय केला आहे.'

(पाहा :SPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय!)

वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास एवढा दंड भरावा लागेल :

1. दारू पिऊन वाहन चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

2. धोकादायक पद्धतीनं गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचं दंड, यापूर्वी एक हजार रुपयांचं दंड आकारण्यात येत होता.

3. ओव्हरलोडिंगवर 20 हजार रुपयांचा दंड

4. सीट बेल्ट न बांधल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होईल.

5. रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता 500 रुपयांचा दंड

6. अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड

7. वाहनांचा अनधिकृतरित्या वापर केल्यास 5 हजार रुपयांचं दंड

(पाहा :VIDEO : आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा आणि इतर 18 महत्त्वाच्या बातम्या)

हे माझ्या विभागाचं अपयश - गडकरी

दरम्यान, देशात केवळ साडेचार टक्के रस्ते दुर्घटना कमी झाल्याची बाबही गडकरींनी यावेळेस मान्य केली. शिवाय, हे माझ्या विभागाचं अपयश असल्याचंही त्यांनी स्वीकार केलं. केवळ तामिळनाडूमध्ये 15 टक्के रस्ते दुर्घटना कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

1 लाख रुपये दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव

ओला, उबेरसारख्या एग्रीगेटर्सद्वारे वाहन चालक परवाना नियमांचं उल्लंघन केल्यास विधेयकातील तरतुदींनुसार 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

SPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या