मोदी सरकारनं जम्मू-काश्मीर, लडाखमधील लोकांच्या खात्यात पाठवले 4 हजार रुपये,कारण...

मोदी सरकारनं जम्मू-काश्मीर, लडाखमधील लोकांच्या खात्यात पाठवले 4 हजार रुपये,कारण...

Jammu-Kashmir तब्बल आठ लाख कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये केंद्र सरकारनं प्रत्येकी चार-चार हजार रुपये जमा केले आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 9 ऑगस्ट : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाखमधील जनतेप्रती मोदी सरकार मेहरबान असल्याचं दिसत आहे. कारण येथील तब्बल आठ लाख कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये केंद्र सरकारनं प्रत्येकी चार-चार हजार रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम कलम 370 (article 370) रद्द करण्यापूर्वीच पाठवली गेली. जेणेकरून येथील शेतकऱ्यांना कर्ज न घेता कोणत्याही अडचणींशिवाय शेती व्यवसाय करणं शक्य होईल.

लवकरच दोन-दोन हजार रुपयांचीही रक्कम जमा केली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ही मदत देण्यात येणार आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 370 रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये आर्थिक मदत पाठवण्याच्या कार्यात गती येईल. कारण येथील प्रशासन थेट केंद्र सरकारच्याच अखत्यारित आलं आहे.

(वाचा : 'काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसांचा जीव गेल्यावर?', अजित पवार CM वर भडकले)

जम्मू काश्मीरमधील जवळपास 80 टक्के लोकसंख्या कृषी व्यवसायावर आपलं पोट भरते. येथील केसरची शेती तर जगप्रसिद्ध आहे. शिवाय, सफरचंदाच्या बागा, कणीस, ज्वारी, बाजरी, कापूस, तंबाखू, गहूचं पिक घेतलं जातं. तसंच येथे मोठ्या प्रमाणात फुलांचीही शेती केली जाते. या फुलांना जगभरात प्रचंड मागणी आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (8 ऑगस्ट) देशवासीयांना संबोधित केलं. जम्मू-काश्मीरमधील लोकांना सर्व योजनांचा लाभ मिळणार, असं विधान यावेळेस त्यांनी केलं. पण ही माहिती देण्यापूर्वीच मोदी सरकारनं येथील शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक मदत पाठवण्यास सुरुवात केली होती.

(वाचा :आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला दणका देण्याच्या तयारीत भारत, 'हा' आहे नवा प्लॅन)

कुठे किती पाठवण्यात आली रक्कम?

बारामुला, कुपवाड़ा, बड़गाम, पूंछ आणि पुलवामाला या मदतीचा सर्वाधिक फायदा झाला आहे. आता राज्यातील अन्य भागांतही आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम जलद गतीनं सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कृषि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनुसार, 8 ऑगस्टपर्यंत केंद्र सरकारकडून सर्वाधिक लाभ कुपवाडातील 77 हजार 038 जनतेपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर बारामुल्लातील 75 हजार 391 लाभार्थी शेतकरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर बड़गांवमधील 63 हजार 392, जम्मूतील 57 हजार 095 आणि पुलवामातील 38 हजार 592 लोकांच्या बँक खात्यांमध्ये चार-चार हजार रुपये ट्रान्सफर केले गेलेत.

(पाहा : पार्किंग, सिग्नल आणि पुतळे सगळंच पाण्याखाली; पाहा कोल्हापुरातली भीषण स्थिती)

येथे सर्वात कमी लाभार्थी

दरम्यानस लेह-लडाखमध्ये केवळ 4 हजार 878 आणि कागरिलमधील 7 हजार 782 लोकांपर्यंतच आर्थिकमध्ये पोहोचली आहे. तर श्रीनगरमधील सर्वाधिक कमी 3 हजार 935 शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

CM साहेबांना पाठवायचाय व्हिडिओ, हसत बोटीतून प्रवास केल्याने गिरीश महाजन ट्रोल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या