उन्नाव, 01 जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक भीषण अपघात घडला आहे. भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीमुळं रस्त्यावर दाट धुके होतं. या दाट धुक्यात भरधाव वेगात येणाऱ्या बसने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका मोठ्या कंटेनरल जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
संबंधित घटना उत्तर प्रदेशतील उन्नाव जिल्ह्यातील आहे. शुक्रवारी सकाळी लखनऊ-आग्रा महामार्गावर उन्नाव येथील मैनीभावा गावाजवळ हा अपघात घडला. घनदाट धुके असलेल्या रस्त्यावर एका कंटेनरच्या मागील भागात डबल डेकर बस घुसली. या अपघातात बसमधील 4 प्रवासी ठार तर 7 गंभीर जखमी झाले आहेत. ही बस कंटेनरच्या मागील भागात किमान पाच फुट आत घुसली होती. त्यावरून अपघात किती भीषण होता, याचा अंदाज लागू शकतो.
(हे वाचा: जुळ्या मुली होताच आईनं त्यांना नाकारलं, अविवाहित डॉक्टर महिलेनं स्वीकारलं)
जखमींना सीएससी येथे नेण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. घाबरलेल्या प्रवाशांनी मिळेल त्या हत्याराने खिडकी फोडून बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. क्रेनच्या मदतीने 5 फिट कंटेनरच्या आत शिरलेली बस बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 70 ते 75 प्रवासी प्रवास करत होते. या बसने अररिया बिहारहून दिल्लीला प्रस्थान केलं होतं. दाट धुक्यामुळे कंटेनरनेही दुसऱ्या एका वाहनाला धडक दिली होती. या अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर सोडून त्याचा चालक फरार झाला होता.
या भीषण अपघातात बस चालक सलाउद्दीन (वय 35), मुलगा मोहम्मद अब्बास, रा. झंझारपूर, मधुबनी बिहार, नसीम खान 23, मुलगा मोहम्मद मुस्लिम खान, सिमरी दरभंगा बिहार, शौकत रझा (वय 21) मुलगा जाफर हुसेन रामपुर अररिया बिहार आणि फारूक (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.