हेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक? ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती

हेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक? ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती

नवा वाहतूक कायदा लागू केल्यानंतर ट्राफिक पोलिसांच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणं समोर येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : देशात जेव्हापासून नवा वाहतूक कायदा लागू झाला आहे तेव्हापासून ट्राफिक पोलिसांच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे समोर येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. मात्र काही प्रकरणं अशी समोर आली आहेत ज्यात दंडाचं कारण पाहून तुम्हालाही धक्का बसेल. उत्तर प्रदेशातील नोएडात एका खासगी बस चालकानं दावा केला आहे की, हेल्मेट न घालता गाडी चालवल्यानं 500 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

निरंकार सिंह नावाच्या व्यक्तीला 11 सप्टेंबरला ऑनलाइन पावती मिळाली होती. शुक्रवारी एका कर्मचाऱ्याने ही पावती पाहिली. निरंकार सिंह यांनी म्हटलं की, परिवहन विभागाच्या या कारभाराने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. लोकांना दंडाच्या कित्येक पावत्या दररोज पाठवल्या जात आहेत. त्याच्या सत्यतेवर शंका उपस्थित होत आहे.

मी संबंधित अधिकाऱ्याशी याबद्दल बोलणार आहे. गरज पडली तर न्यायालयातही जाईन असं निरंकार सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, याची चौकशी सुरु आहे. परिवहन विभागाने ही दंडाची पावती पाठवली आहे. याच्याशी नोएडा पोलिसांचा काही संबंध नाही.

वाचा : तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!

वाचा : वाहतुकीचा नियम मोडलात? 100 रुपयांत सुटू शकता, 'असा' आहे नियम

मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हा कायदाबदल आहे. पात्रता नसतानाही गाडी चालवणाऱ्यांना इतके दिवस 500 रुपये दंड होत होता. तोच आता 10 हजार रुपये झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात होता. तोही आता 10000 रुपयांवर गेला आहे. लायसन्स बरोबर नसेल तर 500 ऐवजी आता 5000 रुपये दंड द्यावा लागेल. त्यामुळे गाडी चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

पोलिसानेच सांगितलं 22 हजारांचा दंड झाल्यावर 400 रुपयांत कसं सुटायचं, VIDEO VIRAL

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

Published by: Suraj Yadav
First published: September 21, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading