Home /News /national /

VIDEO : घरी पोहोचण्याआधी प्रवाशांचा मृत्यूची सामना, धावत्या बसमध्ये पाहा काय झालं?

VIDEO : घरी पोहोचण्याआधी प्रवाशांचा मृत्यूची सामना, धावत्या बसमध्ये पाहा काय झालं?

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये महामार्गावरच अग्नितांडव, पाहा बर्निंग बसचा थरारक VIDEO

    सूरत, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्रात बुधवारपासून अपघातांची मालिका संपण्याचं नाव घेत नसतानाच आणखीन एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. धुळे मुंबई-आग्रा महामार्गावर दुधाच्या टँकरनं कंटेनरला धडक देत पेट घेतल्यानंतर आता आणखीन एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा बर्निंग बसचा थरारक व्हिडीओ महाराष्ट्राजवळ असलेल्या गुजरातच्या सूरतमधील असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये अचानक आग लागली. यावेळी मोठा गोंधळ उडाली आणि पाहता पाहता काही क्षणात बसनं पेट घेतला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता अक्षरश: खिडक्या आणि दारांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत आहेत. या घटनेनंतर दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली आहे. हे वाचा-या देशात आहे हायस्पीड इंटरनेट! अगदी 1GB चा सिनेमाही काही क्षणातच होतो डाउनलोड घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी आणि चालकही या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात गुरुवारी पाहाटे भीषण अपघात झाला. कंटेनरला भरधाव दुधाच्या टँकरनं धडक दिली आहे. महामार्गावर बिघडलेल्या अवस्थेत कंटेनर उभा असताना अचानक मागून आलेल्या भरधाव दुधाच्या टँकरनं जोराची धडक दिली. त्यानंतर दुधाच्या टँकरनं पेट घेतला आणि ही आग वाढत गेली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत कंटेनरमधील एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता तर दुधाच्या टँकरमधील दोन जण गंभीर भाजले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या