उत्तर प्रदेशात बस आणि ट्रकची भीषण धडक, आगीत होरपळून 20 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात बस आणि ट्रकची भीषण धडक, आगीत होरपळून 20 जणांचा मृत्यू

दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की बसला मोठी आग लागली. त्यानंतर आगीमुळे लोकांना वाचवण्यात अडचणी येत होत्या.

  • Share this:

कन्नौज, 11 जानेवारी : उत्तर प्रदेशातील कन्नौज इथं शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात जागेवरच 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. जीटी रोड महामार्गावर बस आणि ट्रकची जबरदस्त धडक झाली. बसमध्ये 45 प्रवाशी होते. त्यातील 20 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फरुखाबादहून जयपूरला जाणाऱ्या बसचा घिलोई गावाजवळ अपघात झाला. या अपघातानंतर बसला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दुर्घटनेतील जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामध्ये 18 ते 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर परिस्थिती इतकी भीषण आहे की, मृतदेह छिन्नविछिन्न झाले असून त्यांची ओळख डीएनए चाचणी केल्यानंतरच पटवता येईल.

अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकक्षकांना भेट देण्यास सांगितलं आहे. तसेच जखमींना तात्काळ वैदकिय मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. काही प्रवासी जखमी अवस्थेत होते त्यांना रुग्णालयात पोहचवण्यात आले. तर काही प्रवासी अडकून पडले होते. एकूण 45 जण या अपघातात अडकले होते. त्यापैकी 25 जणांना वाचवण्यात आले आहे. यातील दोघे जण पुर्णपणे सुरक्षित असून 18-20 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता असल्याचे कानपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितलं.

बस आणि ट्रकच्या अपघात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या अपघाताची संपूर्ण माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागितली आहे. तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुखात आपण सहभागी आहोत असं म्हणत शोक संवेदना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा अपघात दुर्दैवी असल्याचं म्हटलं.

धक्कादायक! गुजरातमध्ये दलित मुलीवर गँग रेप आणि नंतर निर्घृण हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 06:58 AM IST

ताज्या बातम्या