तिरुवनंतपुरम, 2 मे : श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून भारतातही बुरख्यावरून राजकारण सुरू झालं. चेहरा झाकणं किंवा बुरखा घालणं यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा एक लेख 'सामना' मध्ये प्रसिद्ध झाला होता. यानंतर याला साध्वी प्रज्ञासिंह यांनीही समर्थन दिलं. त्यामुळे देशभरात बुरख्याचा हा वाद चांगलाच गाजतो आहे.
बुरख्यामुळे सुरक्षा तपासणीमध्ये अडचणी येतात, सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला ओळखू शकत नाहीत. याचा दहशतवादी फायदा उठवतात. त्यामुळे बुरखा घालू नये, असं 'सामना' च्या लेखामध्ये म्हटलं होतं.यावरून राजकारण झाल्यानंतर आता केरळमधल्या एका मुस्लीम एज्युकेशन सोसायटीने कॉलेजच्या परिसरात मुलींना बुरखा घालायला बंदी केली आहे. त्यासोबत चेहरा झाकण्यालाही मनाई करण्यात आली आहे.
Kerala: Muslim Education Society (MES) has issued a circular banning girl students from covering their faces in colleges.
— ANI (@ANI) May 2, 2019
केरळमधल्या मल्लापुरममधल्या एका शिक्षण संस्थेने हा निर्णय घेतला आहे. मुलींनी कॉलेजमध्ये बुरखा घालून येऊ नये, असे आदेश या शिक्षण संस्थेने दिले आहेत.
रामदास आठवलेंची टीका
बुरख्यावर बंदी घालण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. आपल्या देशात बुरख्यावर अशा पद्धतीने बंदी घालता येणार नाही. बुरखा हा मुस्लीमधर्मीयांच्या परंपरेचा एक भाग आहे, अशी टिप्पणी रामदास आठवलेंनी केली.
===============================================================================
टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल