बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, प्रेमी युगुलाचं जबरदस्तीने लावलं लग्न

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, प्रेमी युगुलाचं जबरदस्तीने लावलं लग्न

'वॅलेंटाईन डे'ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. पार्कमध्ये बसलेल्या प्रेमीयुगुलाचं त्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं.

  • Share this:

रांची, 14 फेब्रुवारी - वॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी जगभरात तरुण तरुणी प्रेमाचा हा उत्सव साजरा करात आहेत. आपल्या  प्रिय व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी त्यांची धडपड असते. आपल्या साथीदारासोबत हा प्रेमाचा दिवस यादगार व्हावा असा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र याला विरोध करणाऱ्याही काही संघटना आहेत. त्यातीलच एक म्हणजे बजरंग दल. रांचीमध्ये तर बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. मोरहाबादमध्ये असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेमीयुगुलाची (Lover Couple) जबरदस्तीने लग्न (Marriage) लावून दिलं. प्रियकराला जबरदस्तीने प्रेयसीच्या कपाळावर कुंकू लावायला आणि भांगात सिंदूर भरायला लावला. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर बागेतील इतर सर्व प्रेमीयुगुलं घाबरली आणि तिथून त्यांनी पळ काढला.

हा सगळा गोंधळ सुरू असतानाच लालपूर पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या दंगेखोरांना ताब्यात घेतलं.

याबाबतीत पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडितांच्या तक्रारीवरून हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल. सध्या पीडितांची विचारपूस सुरू असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जबरदस्तीने लावलं लग्न 

पीडित प्रेमीयुगुल हे ऑक्सीजन पार्कमध्ये बसलं होतं. त्याचवेळी बजरंग दलाचे नऊ ते दहा कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी प्रेमीयुगुलाला पकडलं. आणि जबरदस्तीने बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या भांगेत कुंकु भरायला लावलं. रांची पोलिसांनी वॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमिवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचा दावा केलाय. मात्र या हल्ल्यामुळे पोलिसांचा हा दावा फोल ठरलाय. मात्र हा हल्ला झाला असला तरी शहरातील पार्कमध्ये प्रेमीयुगुल आणि पती-पत्नी पोहोचले आणि त्यांनी वॅलेंटाईन डे साजरा केला.

-----------

Valentines Day ला डेटिंगवर जाताय, 'या' गोष्टी टाळा नाहीतर घोळ होईल

इश्कवाला लव्ह ! आकर्षण ते प्रेमापर्यंतचा प्रवास, अशी होते लव्ह स्टोरीची सुरुवात

बापमाणूस! पुलवामा शहिदांच्या मुलांसाठी सेहवागने केलं अभिमानास्पद काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 06:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading