मराठी बातम्या /बातम्या /देश /

'झिंग झिंग झिंगाट'च्या गाण्यावर नवरदेवाने झाडल्या गोळ्या; लग्नाच्या वरातीतील आणखी एक VIDEO

'झिंग झिंग झिंगाट'च्या गाण्यावर नवरदेवाने झाडल्या गोळ्या; लग्नाच्या वरातीतील आणखी एक VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

अहमदाबाद, 10 डिसेंबर :  वाढदिवसाला तलवारीने केक कापणे..लग्नात वराने बंदुकीच्या गोळ्या झाडणे...अशा अनेक बातम्या गेल्या अनेक दिवसात समोर आल्या आहेत. त्यातच अहमदाबादमधून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वरातीत नवरदेवाने हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. ही घटना ओढव भागातील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभास बंदी होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून लग्नाचे आयोजन थांबविण्यात आलं नव्हतं. अशातच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा लग्न सोहळे सुरू झाले आहेत.

" isDesktop="true" id="504004" >

असाच प्रकार बिहारमध्येही उघडकीस आला आहे. लग्नमंडपात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहतास इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडीओ खुटिया-मठिया इथला असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाच्या दोन्ही बाजूला लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं बसली आहेत. सुटाबुटात असलेला तरुण हातातून पिस्तूल काढतो आणि हवेत गोळीबार करतो. गोळीबार करणारा तरुण CISFचा जवान असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या भावाच्या लग्नात आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी आलेल्या या तरुणानं हवेत गोळीबार केला आहे.

भावाच्या लग्नात सुटाबुटात आलेल्या या तरुणानं हवेत गोळीबार केला आहे. या तरुणाला लग्नमंडपात कुणी अडवत नाही किंवा ओरडत देखील नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना बिहारच्या रोहतास इथली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Marriage