S M L
Football World Cup 2018

गोळ्यांनी चाळण केलेल्या अवस्थेत सापडला ले. उमर फैयाज यांचा मृतदेह

Samruddha Bhambure | Updated On: May 10, 2017 12:35 PM IST

गोळ्यांनी चाळण केलेल्या अवस्थेत सापडला ले. उमर फैयाज यांचा मृतदेह

10 मे : जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात लेफ्टनंट उमर फैयाज यांचा गोळ्यांनी चाळण झालेला मृतदेह सापडला आहे. दक्षिण काश्मीरच्या हरमन भागात हा मृतदेह आढळला आहे. कुलगाममध्ये राहणाऱ्या फैयाज यांचे काल दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

उमर अलिकडेच डिसेंबर 2016 मध्ये सैन्यात दाखल झाले होते आणि काल ते एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. त्यांच्या शरीराची अक्षरश: चाळण करण्यात आली होती. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या विटंबनेचे हे ताजे उदाहरण आहे.

गेल्या, आठवड्यात कृष्णा घाटीत भारतीय जवानांच्या शरीराची विटंबना करण्यात आल्यानंतर देशभरात याविरोधात संतापाची लाट उसळली होती.

कोण होते ले. उमर फैयाज?

- 8 जून 1994मध्ये त्यांचा जन्म झाला.

- काश्मीरमधील कुलगामच्या सुरसोना गावचे रहिवासी

- 22 वर्षांचा फैयाज10 डिसेंबर 2016 ला सेवेत रूजू

- 2 राजपुताना रायफलचा अधिकारी

- नुकतीच डॉक्टर म्हणून भारतीय लष्करात नोकरी

- अत्यंत उत्तम खेळाडू

- हॉकीत राष्ट्रीय स्तरावर यश

- फैयाज गावातल्या अनेक तरुणांचं प्रेरणास्थान

लष्कराची प्रतिक्रिया:

काही दहशतवाद्यांनी काल लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फैय्याज यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. एका लग्नासाठी ते कुलगामममधल्या आपल्या मूळगावी रजेवर आले होते. या शूर अधिकाऱ्याला लष्कराचा सलाम. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना लष्कर धडा शिकवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close