गुजरातमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बैलाने हवेत उडवले, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बैलाने हवेत उडवले, व्हिडिओ व्हायरल

गुजरातच्या भरुचमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चाचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये एक बैल एका महिलेला ढुशी मारताना दिसतोय.

  • Share this:

19 मार्च : गुजरातच्या भरुचमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चाचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये एक बैल एका महिलेला ढुशी मारताना दिसतोय. बैल हा शांतताप्रिय प्राणी समजला जातो. मात्र कधीकधी काही कारणांमुळे बैल हा प्राणी हिंसक होतात. या व्हिडिओतदेखील तसाच काहीसा प्रकार पाहायला मिळतोय.

सुरुवातीला हा बैल शांतपणे रस्त्यावरून जात होता. मात्र त्यानं अचानकपणे रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेला जोरदार ढुशी दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे पादचारी महिला हवेत पाच ते सात फूट उंच फेकली गेली आणि रस्त्याचा कडेला फेकली गेली.  हा प्रकार पाहून आजुबाजूचे लोकही काही वेळासाठी घाबरले होते. परंतु, महिलेला धडक मारल्यानंतर बैल शांतपणे तसाच पुढे निघून गेला. त्यामुळे हा बैल अचानक थोड्या वेळासाठी इतका हिंसक का झाला, असा प्रश्न अनेकांना पडला.

First published: March 19, 2018, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading