Home /News /national /

अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थिनी पडली छेडछाडीचा बळी, मिळाली होती 4 कोटींची स्कॉलरशिप

अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थिनी पडली छेडछाडीचा बळी, मिळाली होती 4 कोटींची स्कॉलरशिप

सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेत परतणारी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुदीक्षा कोरोनामुळे मायदेशी परतली होती.

    बुलंदशहर, 11 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक घटना घडली. अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा (Sudeeksha bhati death) सोमवारी छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा भाटी दोन वर्षांपूर्वी इंटरमिजिएट परीक्षेत बुलंदशहर जिल्ह्यात प्रथम आली होती. त्यानंतर स्कॉलरशिपच्या जोरावर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. मात्र कोरोनामुळे भारतात आलेल्या सुदीक्षाचा काही मुलांमुळे आपला जीव गमवावा लागला. सोमवारी आपल्या काकांसमवेत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुलं सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षानं अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला. वाचा-'एका तासाच्या आत मोदींना ठार करेन', एका फोन कॉलनं हादरलं पोलीस स्टेशन सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेत परतणारी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुदीक्षा कोरोनामुळे मायदेशी परतली होती. मिळालेल्या माहितीनुसार सुदिक्षा भाटीनं 2018 मध्ये इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले होते. त्यानंतर सुदिक्षाला HCLने 3 कोटी 80 लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती दिली, ज्याच्या जोरावर सुदीक्षा अमेरिकेतील बॉबसन कॉलेजमध्ये शिकत होती. वाचा-कुत्र्यानं उडी मारली आणि प्लायवूडचा ढिगारा कोसळला, सख्ख्या बहिणींचा मृत्यू सुदिक्षाचे कुटुंब गौतम बुद्ध नगरातील दादरी भागात राहतात. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुदीक्षा कोरोनामुळे अमेरिकेतून घरी परतली. ती तिच्या मावशीला भेटायला जात होती. त्यावेळीच हा सगळा प्रकार घडला. 20 ऑगस्ट रोजी सुदीक्षा अमेरिकेला जाणार होती, मात्र त्याआधीच दुष्कर्मी मुलांमुळे सुदिक्षाला आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी सुदिक्षाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. अज्ञात दुचाकीस्वारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या