दुसऱ्या मुलीशी लग्न जमल्याने प्रेयसीने प्रियकरावर केला अ‍ॅसीड हल्ला

दुसऱ्या मुलीशी लग्न जमल्याने प्रेयसीने प्रियकरावर केला अ‍ॅसीड हल्ला

उमेशचं दुसऱ्याच दिवशी लग्न होतं. त्याने हाताला मेंदीही लावली होती. पण वरात निघण्याच्या आधीच पूर्वीच्या प्रेयसीने अ‍ॅसिड हल्ला केला.

  • Share this:

लखनऊ 18 जून :  ज्या तरुणावर अनेक वर्ष प्रेम केलं त्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न जमल्याने रागावलेल्या तरुणीने त्याच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण जखमी झालाय. त्याचं दुसऱ्याच दिवशी लग्न होतं. मात्र या हल्ल्यामुळे त्याचं लग्न पुढे ढकलण्यात आलंय. उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. त्या तरुणीला पोलिसांनी अटक केलीय. रागाच्या भरात हा हल्ला केल्याचं तिने कबूल केलंय.

उमेश असं त्या पीडित तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं लग्न ठरलं होतं. त्याने हाताला मेंदीही लावली होती. दुसऱ्या दिवशी त्याची वरातही निघणार होती. मात्र आदल्याच दिवशी झोपलेल्या उमेशवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणीने अ‍ॅसीड फेकलं. त्यात तो जखमी झाला. उमेश आणि त्या तरुणीचं अनेक वर्ष प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. मात्र उमेशच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नाही.

कुटुंबीयांनी उमेशचं लग्न दुसऱ्याच नात्यातल्या एका मुलीशी जमवलं आणि लग्नाची तारिखही काढली. उमेशही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने त्या तरुणीला आपण आता वेगळ्या मार्गाने जाऊ असं सांगत तिच्यापासून तो दूर झाला.

उमेशचं दूर होणं ती सहन करू शकली नाही आणि तिने हल्ल्याची योजना बनवली. कुठल्याही परिस्थितीत त्याचं लग्न होऊच द्यायचं नाही असा तिचा प्लॅन होता. त्यानुसार एका दुकानातून तिने अ‍ॅसिड आणून झोपलेल्या उमेशवर अख्खी बॉटलच फेकून मारली. उमेशला दवाखाण्यात भरती करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

First published: June 18, 2019, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading