आधी जेवायला बोलवलं मग केली मित्राची हत्या, 6 दिवस पोलिसांसोबतच फिरत होता आरोपी अखेर...

आधी जेवायला बोलवलं मग केली मित्राची हत्या, 6 दिवस पोलिसांसोबतच फिरत होता आरोपी अखेर...

पोलिसांसमोर विक्कीने कबुल केले की त्यानं 3 महिन्यात तबब्ल 25 वेळा धर्मेंद्रला जेवायला बोलवले. मात्र 26व्या वेळी जेवण्याआधीच विक्कीनं धर्मेंद्रचा खून केला.

  • Share this:

बुलंदशहर, 06 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक प्रकार घडला. इथं एक सख्खा मित्रचं पक्का वैरी निघाला. खुर्जा येथे राहणारा विवेक उर्फ ​विक्की आणि बुलंदशहर येथील वकील धर्मेंद्र चांगले मित्र होते. यांची मैत्री एवढी पक्की होती की विवेक धर्मेंद्रला आपला भाऊ मानत असे, मात्र पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये अचानक भांडण झालं. यामुळे ​विक्कीने लॉकडाऊन आपल्या मित्राचाच पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी विक्कीने प्लॅन रचला, आणि आपल्या मित्राला जेवायला बोलवले. जेवण्याच्या बहाण्याने विक्की धर्मेंद्रला आपल्या कारखान्यात बोलावून घ्यायचा. मात्र त्याला धर्मेंद्रला मारण्याची संधी मिळत नव्हती. पोलिसांसमोर विक्कीने कबुल केले की त्यानं 3 महिन्यात तबब्ल 25 वेळा धर्मेंद्रला जेवायला बोलवले. मात्र 26व्या वेळी जेवण्याआधीच विक्कीनं धर्मेंद्रचा खून केला.

वाचा-मित्राच्या डोळ्यांदेखत तरुणीला उचलून नेलं, 2 नराधमांनी केला बलात्कार

असा रचला हत्येचा प्लॅन

तीन महिन्यांत विक्कीने धर्मेंद्रला बुलंदशहरातू खुर्जा इथं जेवणासाठी 25 वेळा फोन केला होता. धर्मेंद्र इतक्या लांब जायचा कारण खुर्जेचे चीज-बटाटे फार प्रसिद्ध आहेत, पण विक्की दोन नोकरांसमवेत धर्मेंद्रची हत्या करण्यासाठी त्याला बोलवत होता. विक्कीने पोलिसांना सांगितले, प्रत्येकवेळी त्यांच्या मित्रांना जेवण्याच्या प्लॅनबाबत कळायचे आणि ते तेथे पोहचायचे. 25 जुलै रोजी संध्याकाळी विक्कीने पुन्हा धर्मेंद्रला बोलवले दिली. यावेळी त्याचे नोकरही तयार होते. यावेळी तिघांनी जेवणाची तयारी न करता धर्मेंद्रची हत्या केली. ओळख लपविण्यासाठी त्यांनी धारदार शस्त्रांनी धर्मेंद्रच्या चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर गोदामातच तयार केलेल्या सेफ्टी टँकमध्ये मृतदेह पुरण्यात आला.

वाचा-पुण्यात महिलेवर बलात्कार, 24 तासांत पोलिसांनी आरोपीला केली अटक

6 दिवस पोलिसांसोबत धर्मेंद्रचा शोध घेत होता विक्की

धर्मेंद्र बेपत्ता होताच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बुलंदशहरमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोधही सुरू केला. विक्कीने पोलिसांसह मित्राचा शोधही सुरू केला. ज्या जंगलात धर्मेंद्रची दुचाकी सापडली त्या जंगलात पोलिसांनी ड्रोनद्वारे शोधही घेतला, पण धर्मेंद्र सापडला नाही. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी खबऱ्यांनी पोलिसांना धर्मेंद्रची हत्या झाल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी विक्कीच्या गोदामाची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी गोदामात पुरलेला मृतदेह सापडला. विक्की आणि त्याच्या दोन नोकरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading