नराधमपणाचा कळस! नवऱ्याने बायकोला 4 लाखांना विकून टाकलं, नंतर झाला सामूहिक बलात्कार

नराधमपणाचा कळस! नवऱ्याने बायकोला 4 लाखांना विकून टाकलं, नंतर झाला सामूहिक बलात्कार

महिलेची खरेदी करणाऱ्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

बुलंदशहर, 7 डिसेंबर : महिलेला तिच्या नवऱ्याने 4 लाख रुपयांना विकून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच या महिलेची खरेदी करणाऱ्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं बुलंदशहमध्ये खळबळ उडाली आहे.

'माझं लग्न अजित सिंह याच्याशी झालं होतं. मात्र नंतर त्याने मला घरातून काढून टाकलं. त्यानंतर मी माहेरी आले, पण माहेरच्या लोकांनीही मला स्वीकारलं नाही,' असा आरोप पीडित महिलेनं केल आहे. तसंच मी राहत असलेल्या गावात माझ्या पतीचं येणंजाणं होत होतं. त्या गावात पप्पन आणि रामवती या दोन मित्रांकडे ते येत असत. हे दोघेही स्वत:ला भक्त समजत होते आणि दरबार भरवत होते. त्यामुळे मी त्या दोघांकडे आमच्या भांडणातील तोडगा काढण्याची विनंती केली,' अशी माहिती पीडितेनी दिली आहे.

हेही वाचा: नवरदेवासह नातेवाईकांना अर्धनग्न करून केली मारहाण, धक्कादायक कारण समोर!

'आमच्यातील वाद सोडण्यावण्यासाठी त्या दोघांनी माझ्या पतीला आणि गावातीलच एक रहिवासी अजब सिंह याला बोलावलं. पण पती-पत्नीतील भांडण सोडवण्याऐवजी त्यांनी मला अजब सिंह या व्यक्तीला चार लाखांना विकून टाकलं,' असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

'ज्या व्यक्तीला मला विकण्यात आलं होतं त्या अजब सिंह आणि त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर अजब सिंहने मला बळजबरीने एका घरात नेऊन ठेवलं. मी पळून गेले तर माझ्या मुलींना मारून टाकू, अशी धमकी मला देण्यात आली होती,' असं पीडित महिलेचं म्हणणं आहे. खोलीत डांबून ठेवल्यानंतर कशीबशी ती महिला तिथून सुटली आणि तिने थेट पोलीस स्थानक गाठलं. त्यानंतर याप्रकरणी महिलेची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या