मध्य प्रदेश, 12 ऑगस्ट : फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्रांना पार्टी देण्याचं एक भन्नाट प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशच्या जबलपुर जिल्ह्यात एका बिल्डरच्या 10वीमध्ये शिकणाऱ्या मुलाने फ्रेंडशिप डेच्या दिवशीच त्याच्या मित्रांना चक्क 46 लाख रुपये वाटले. यात त्याने त्याच्या एका मित्राला सगळ्यात जास्त म्हणजे 15 लाख रुपये दिले कारण तो मजूरी करायचा. तर जो मित्र रोज त्याला त्याचा अभ्यास करून द्यायचा त्याला 3 लाख रुपये दिले. खरंतर त्याने त्याच्या वर्गातल्या सगळ्या मित्रांना फ्रेंडशिप डेला गिफ्ट म्हणून पैसे वाटले.
या पठ्ठ्याने कोणालाच रिकाम्या हाती नाही पाठवलं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण त्याने त्याच्या चक्क 35 मित्रांना स्मार्टफोन दिला तर काही मित्रांना चांदीची चैन गिफ्ट म्हणून दिली. आता तुम्ही नक्कीच विचारात असाल की बिल्डरच्या या चिरंजीवाकडे एवढी मोठी रक्कम आली तरी कशी? खरंतर बिल्डरने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार त्याने एका प्रोजेक्टमध्ये मिळालेले 60 लाख रुपये त्यांच्या घराच्या कपाटात ठेवले होते. पण अचानक कपाटातून पैसे गायब झाले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण चोरीचं कोणतंही प्रकरण समोर आलं नाही.
पण जसजसा पोलिसांचा तपास वाढला तसं हे समोर आलं की बिल्डरच्या मुलाने ते पैसे त्याच्या शेजारी मित्रामंध्ये, शाळेतल्य़ा मित्रांमध्ये आणि गरजू मुलांमध्ये वाटूव टाकले. सध्या पोलीस सगळे पैसे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. या बहाद्दराने कोणाकोणाला पैसे वाटले याची लिस्ट घेऊन आता पोलीस आता पैसे परत जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, ज्या मुलाला जास्त पैसे देण्यात आले होते तो सध्या गायब आहे. त्याच्या वडिलांना ते पैसे परत करण्यास सांगितलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सगळी मुलं ही अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे.
सारा खानने केले बिकनीतले फोटो शेअर, फॅन्सनी केलं भन्नाट ट्रोल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Friendship day, Gift, Jabalpur, MP