Budget 2021: कशासाठी शेतीसाठी... दारूवर लागणार 100 टक्के Cess

Budget 2021: कशासाठी शेतीसाठी... दारूवर लागणार 100 टक्के Cess

व्हिस्की, स्कॉच, बरबन, ब्रँडी अशा सर्व प्रकारच्या विदेशी दारूवर किंवा अल्कोहोलिक पेयांवर (Alcoholic beverages)100 टक्के कृषी अधिभार सर्व प्रकारच्या लावण्यात येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखवली आहे. कृषी सुविधा करापोटी (agri infra cess )काही उत्पादनांवर विशेष अधिभार लावण्यात येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दारूवर (Alcoholic beverages)यातला 100 टक्के सेस लावण्यात येणार आहे.

कृषी सुविधा विकास कर Agriculture Infrastructure and Development Cess (AIDC)नावाने हा अधिभार लावण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अल्कोहोलिक पेयांवरची बेसिक कस्मट ड्युटी कमी करून हा सेस वाढवल्यामुळे ग्राहकांवर मोठा बाज पडणार नाही."

सीतारामन म्हणाल्या, "कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकासासाठी निधी या करातून निर्माण होईल. 100 टक्के कराची तरतूद असली तरी त्याचं ग्राहकांवर थेट ओझं पडणार नाही याची तरतूद केलेली आहे."

आजी-आजोबांना दिलासा; मुला-नातवंडांच्या तोंडाला पानं पुसली

व्हिस्की, स्कॉच, बरबन, ब्रँडी अशा सर्व प्रकारच्या विदेशी दारूवर किंवा अल्कोहोलिक पेयांवर (Alcoholic beverages)100 टक्के कृषी अधिभार सर्व प्रकारच्या लावण्यात येईल.

निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कृषी पत लक्ष्य (Agriculture Credit Target) वाढविण्याविषयी माहिती दिली. त्यांचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध असल्याचेही अर्थमंत्री म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, 2021-22 मध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कृषी पतपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. गेल्या वर्षी हे लक्ष्य 15 लाख कोटी होते, त्यामध्ये यावर्षी 1.5 लाख कोटींची वाढ होऊन हे लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

Budget 2021: सीतारामन यांनी ठरवून ही लाल साडी नेसूनच का मांडला अर्थसंकल्प?

अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सर्व पिकांवर उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी (MSP) देण्यात येत आहे.

First published: February 1, 2021, 4:29 PM IST

ताज्या बातम्या