Budget 2021: आजी-आजोबांना दिलासा; मुला-नातवंडांच्या तोंडाला पानं पुसली

Budget 2021: आजी-आजोबांना दिलासा; मुला-नातवंडांच्या तोंडाला पानं पुसली

इन्कम टॅक्समध्ये (ITR)या वर्षीच्या अर्थसंकल्पाने कुठलाही बदल सुचवलेला नाही. फक्त ज्येष्ठ नागरिकांना ITR मधून मोठी सवलत जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोनाकाळातल्या या अर्थसंकल्पाकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलते का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढते का या प्रश्नांकडे होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी याबाबतीत मध्यमवर्गीय नोकरदारांची निराशा केली आहे.

2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल सुचवण्यात आलेला नाही. अर्थातच करमुक्त उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा फार काही बदल अपेक्षित नाही.

ज्येष्ठ नागरिकांना फायदा

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक तरतूद सीतारामन यांनी जाहीर केली आहे. यापुढे 75 वर्षांवरील नागरिकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची आवश्यकता नाही. या घोषणेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळू शकतो. ITR भरावा लागणार नाही.

पगारदार कर्मचारी आयकराची गणना अशाप्रकारे करू शकतात -

सर्वप्रथम संबंधित व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नाची गणना करणे आवश्यक आहे. आपल्या एकूण पगारातून सर्व उपलब्ध वजावटी आणि सुट वगळता, जसं की लीव्ह ट्रॅव्हल अलाऊंस (एलटीए), घर भाड्याचा भत्ता (एचआरए) या गोष्टी समायोजित करुन करपात्र उत्पन्नाची गणना केली जाऊ शकते. पुढील स्टेप म्हणजे, जर आपला पगार आयकराच्या चौकटी येत असेल तर तो कोणत्या स्लॅबच्या खाली येईल, हे तपासणे गरजेचे आहे.

तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये येता ?

2020-21 या वर्षात 2.5 लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांसाठी 0 टक्के आयकर होता. तर, अडीच ते 5 लाखाच्या दरम्यान इनकम असणाऱ्यांना 5 टक्के, 5 ते साडेसात लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांना 10 टक्के, साडेसात ते10 लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांना 15 टक्के, 10 ते 12.5 लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांना 20 टक्के, 12.5 लाख ते 15 लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांना 25 टक्के आणि 15 लाखावरील इनकम असणाऱ्यांना 30 टक्के आयकर भरावा लागत होता.

First published: February 1, 2021, 1:07 PM IST

ताज्या बातम्या