Budget 2020 : बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी का नेसली पिवळी साडी?

Budget 2020 : बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी का नेसली पिवळी साडी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेदर बॅगमध्ये बजेटची कागदपत्रं आणण्याची परंपरा मोडली होती तसंच अनेक बाबतीत त्यांनी परंपरांना छेद दिला आहे. निर्मला सीतारामन या पूर्ण वेळ अर्थमंत्री असलेल्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. मागच्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी त्यांनी सुटकेसऐवजी लाल रंगाचं वही खातं हातात घेऊन संसदेत प्रवेश केला. बजेटच्या या भाषणासाठी अर्थमंत्र्यांनी पिवळ्या रंगाच्या साडीची निवड केली. भारतीय परंपरेत पिवळा रंग हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो. या बजेटनंतर देशात समृद्धी यावी हाच यामागचा उद्देश असावा. मागच्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी गुलाबी सिल्कची साडी नेसली होती.

या परंपरांना छेद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेदर बॅगमध्ये बजेटची कागदपत्रं आणण्याची परंपरा मोडली होती तसंच अनेक बाबतीत त्यांनी परंपरांना छेद दिला आहे. निर्मला सीतारामन या पूर्ण वेळ अर्थमंत्री असलेल्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. निर्मला सीतारामन नेहमीच साडीच्या पोषाखात दिसतात. डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या रंगांची त्या निवड करतात. पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा अशा रंगांच्या सुती साड्यांमध्ये त्या नेहमी दिसतात. आपल्या अर्थमंत्र्यांना दागिन्यांचा फारसा सोस नाही हेही दिसतं. एक सोन्याचं कडं, चेन आणि छोटेसे कानातले एवढेच दागिने त्या घालतात.

(हेही वाचा : Budget 2020: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 16 कलमी कार्यक्रम)

अर्थमंत्र्यांच्या साड्या

आंध्र प्रदेशची पोचमपल्ली साडी त्यांना खूप आवडते. हँडलूम साड्यांना त्यांची पहिली पसंती असते. ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांतल्या सिल्कच्या साड्या त्यांना विशेष आवडतात. निर्मला सीतारामन यांच्याआधीही एका महिलेने अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधानही होत्या. इंदिरा गांधी यांनाही रेशमी, हँडलूमच्या साड्या अधिक आवडत असत. बहुतेक वेळा त्या पांढऱ्या किंवा हलक्या रंगांच्या सुती साड्या नेसायच्या. त्यावर प्लेन ब्लाउज असायचं. अशा साड्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसायच्या.

================================================================================

First published: February 1, 2020, 12:03 PM IST

ताज्या बातम्या