घर खरेदी करताय? अर्थसंकल्पापर्यंत थांबा, होऊ शकते मोठी बचत

घर खरेदी करताय? अर्थसंकल्पापर्यंत थांबा, होऊ शकते मोठी बचत

रियल इस्टेटमधील मंदी दूर होण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : केंद्राचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सर्वसामान्यांचा विचार करुन अर्थसंकल्पाची आखणी केल्याची चर्चा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री घर खरेदीकरणाऱ्यांसाठी मोठी सूट देणार आहेत. यामध्ये होम लोन व दुसरे रेंटल हाऊसिंगसंदर्भात मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

होम लोनच्या व्याजावरील आयकरमध्ये सूट

होम लोनच्या माध्यमातून घर खरेदीदारांना यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी बचत होऊ शकते. होम लोनच्या व्याजावर आकारल्या जाणाऱ्या आयकरमध्ये अधिक चांगली सूट मिळू शकते. सध्या सेक्शन 24 अंतर्गत होम लोनवरील व्याजावर टॅक्स सूट जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत मिळते. हाऊसिंग मंत्रालयाने होम लोनच्या व्याजावरील आकारल्या जाणाऱ्या आयकरला मिळणारी सूट 5 लाख रुपयांपर्यंत करण्याची शिफारस केली आहे. कदाचित ही सूट 5 लाखांपर्यंत नसली तरी यामध्ये सर्वसामान्यांची बचत होण्याची शक्यता आहे. म्हणजेच होम लोनच्या माध्यमातून घर खरेदी केल्यास व्याजेवर आयकरपेक्षा जास्त सूट मिळू शकते.

सेक्शन 80-C अंतर्गत होम लोन प्रिंसिपलवर सूट

सध्या होम लोनच्या प्रिंसिपलवर कोणतीही सूट नाही. सेक्शन 80 C च्या अंतर्गत जास्तीतजास्त 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट घेऊ शकता. या सूटमध्ये वाढ करण्याची शिफारीस करण्यात आली आहे. 80 C या सेक्शनच्या व्यतिरिक्त केवळ होम लोन संदर्भातील सेक्शन तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

इतकंच नाही, रियल इस्टेटची मंदी दूर करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केला जाणार आहे. देशातील प्रमुख उद्योग मंडळ (भारतीय उद्योग परिसंघ) CII ने ही घर खरेदीदारांना अर्थसंकल्पात अधिक फायदा देण्यासाठी आग्रह केला आहे. सध्या रियल इस्टेटमधील मंदी दूर करण्यासाठी घर खरेदीदारांना मिळाणारे टॅक्समधून सूट वा फायदे वाढविण्यात येणार आहे.

 

First published: January 27, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या