Budget 2019 : घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार घेऊ शकते हा निर्णय

Budget 2019 : घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार घेऊ शकते हा निर्णय

Budget 2019 : घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जून : आगामी आर्थिक बजेटमध्ये मोदी सरकार घर खरेदीदारांसाठी दिलासादायक निर्णय घेऊ शकते. CNBC आवाजनं याबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. 5 जुलै रोजी आर्थिक बजेट सादर केलं जाणार आहे. यावेळी होम लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. घर खरेदीदारांच्या व्याज दरात कपात करण्याचा सरकार सध्या विचार करत आहे. शिवाय, रियल इस्टेटबाबत देखील काही असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. अर्थ मंत्रालयानं CREDAIकडून याबाबतचे आकडे मागून घेतले आहेत. त्या आकडेवारीचा अभ्यास करून घर खरेदीदारांना काही सुट देता येईल का? याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे.
रियल इस्टेटला उभारी देण्याचा प्रयत्न

मागील काही दिवसांपासून रियल इस्टेटमध्ये मंदीचं वातावरण आहे. या मंदीमधून सावरण्यासाठी देखील सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. त्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये विषेशता घर खरेदीदारांना व्याज दरामध्ये सुट दिली जाऊ शकते. तसंच प्रिन्सिपल टॅक्समधील सुट देखील वाढू शकते. याबाबतची सर्व स्पष्टता आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर होणार आहे.

CREDAIकडून मागवले आकडे

अर्थ मंत्रालयानं CREDAIकडून किती घरांवर होम लोन सुरू आहे? आणखी किती घरांची बांधणी केली जाणार आहे? याची विचारणा केली आहे. या आकड्यांचा विचार करता सरकार टॅक्समध्ये दिली जाणारी सुट आणि व्याज दर यावर विचार करणार आहे. CREDAI देखील सरकारकडं व्याज दरांमध्ये सूट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.


औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या