शेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शेतकऱ्यांची अनेक आघाड्यांवर निराशा झाल्याचा आरोप करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 10:17 AM IST

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्जाचं मिळणार गिफ्ट

नवी दिल्ली, 4 जुलै : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शेतकऱ्यांची अनेक आघाड्यांवर निराशा झाल्याचा आरोप करण्यात आला. देशभरात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन छेडल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर आता दुसऱ्या टर्ममध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असेलेली ही समिती 2 महिन्यात आपला रिपोर्ट देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयोजक असणार आहेत.

केंद्र सरकारकडून लवकरच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काही बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

1. किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज

अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. आता या कार्डवर तीन लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे. तसंच सरकार या कार्डवर 1 लाख रुपये एवढं बिनव्याजी कर्ज देण्याची शक्यता आहे.

2. दिला जाणाऱ्या निधीत वाढ होणार?

Loading...

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार एवढी रक्कम देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या रक्कमेत वाढ होऊन हा निधी 8 हजारांपर्यंत दिला जाऊ शकतो.

3. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं आश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली दिलं होतं. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं, याबाबत अजूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4. कमी पाण्याच्या पिकांनी मिळू शकते प्रोत्साहन

पाण्याच्या वाढत्या संकटासाठी ऊसासारखी जास्त पाणी घेणारी पिकं कारणीभूत असल्याचं नीति आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार कमी पाणी लागणारे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात केंद्र सरकार अशा विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता प्रत्यक्षात खरंच सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेतं का, हे पाहावं लागेल.

फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन'चा निर्धार, Mrs मुख्यमंत्री म्हणाल्या 'कल हो ना हो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...