अर्थसंकल्प 2018मध्ये महिलांसाठी असू शकतात 'या' खास योजना

अर्थसंकल्प 2018मध्ये महिलांसाठी असू शकतात 'या' खास योजना

अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी संसदेत 2018चं अर्थसंकल्प जाहिर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष म्हणजे महिलांना रोजगार मिळवून देण्याचा विचार केला जावू शकतो.

  • Share this:

31 जानेवारी : अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी संसदेत 2018चं अर्थसंकल्प जाहिर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष म्हणजे महिलांना रोजगार मिळवून देण्याचा विचार केला जावू शकतो. महिलांसाठी या अर्थसंकल्पात काय खास आहे पाहुयात.

सुत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात महिला कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओसारख्या योजनांमध्ये योगदान दर कमी होण्याची शक्यता आहे. पीएफ योजनांमधून महिला कामगारांसाठी योगदान दर 6 ते 10 टक्के असू शकतो.

2018च्या अर्थसंकल्पात महिलांचा रोजगार वाढवणे, विशेषत: महिला कर्मचा-यांची नियुक्त करण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन देणे अशा सुविधा राबण्यात येऊ शकतात. औपचारिक सेक्टरमधील महिला कर्मचाऱ्यांना ईपीएफओ, विमा, पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडसारख्या योजना फायदेशीर असतील. 20 कर्मचारी असलेल्या सर्व संस्थांमध्ये ईपीएफओ लागू आहे.

अर्थसंकल्पात देशाच्या कामगारांच्या संख्येत स्त्री आणि पुरुष यांच्यात मोठ्या प्रमाणात अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्याचा उल्लेख आर्थिक समीक्षा 2017-18मध्ये केला गेला आहे.

सोमवारी सभागृहात अरुण जेटली यांनी सादर केलेल्या आथिर्क पाहणी अहवालाचा रंगही यावेळी गुलाबी ठेवण्यात आला होता, यातून सरकार महिला सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देत असल्याचा संदेश देतं.

औपचारिक सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणं आणि कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढ करणं अशा उपाययोजना जाहीर केल्या जाऊ शकतात.

ईपीएफओ योजनेअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला विशेष आर्थिक मदत करण्यात येऊ शकते.

या सगळ्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या बाबी फायद्याच्या ठरतील याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: January 31, 2018, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading