BUdget 2018 : शालेय शिक्षणासाठी काय ?

BUdget 2018 : शालेय शिक्षणासाठी काय ?

विद्यार्थ्यांची प्रयोगशीलता वाढविण्यासाठी त्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आर्थिक संकल्पात या गोष्टींविषयी तरतूद असायला हवी.

  • Share this:

01 फेब्रुवारी : शालेय शिक्षणासाठी आजच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणार का यावर हा स्पेशल रिपोर्ट...

शिक्षण विकास यांचा जवळचा संबंध आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे तरुणांचा विचार केल्यास त्यांना उत्तम शिक्षण मिळणे गरजेचे आहे, पण असे होताना दिसत नाही. प्रगत देशांच्या अर्थसंकल्पात ६ टक्के तरतूद ही शिक्षणासाठी असते. मात्र, आपल्याकडे शिक्षणासाठी सुमारे दीड टक्के तरतूद आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात ही तरतूद दुप्पट करून ३ टक्क्यांपर्यंत झाली पाहिजे.

शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद असण्याची आवश्यकता आहे. शाळा स्तरावर नियोजन करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मंजूर झालेला निधी शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक यंत्रणा कार्यरत करण्याची आवश्यकता आहे.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा विचार करताना, संशोधनासाठी विशेष निधीची तरतूद व्हायला हवी. हुशार विद्यार्थी अनेक आहेत, पण अनेकदा संशोधनाकडे पाठ फिरविली जाते. हे टाळण्यासाठी संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. याचबरोबरीने प्रशिक्षणावर भर दिला पाहिजे. विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांनादेखील प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.

विद्यार्थ्यांची प्रयोगशीलता वाढविण्यासाठी त्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आर्थिक संकल्पात या गोष्टींविषयी तरतूद असायला हवी. विद्यार्थ्यांमधील कौशल्यविकासासाठी विशेष तरतूद करायला हवी. उच्च शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तब्बल १ लाख कोटी रुपयांची तरतूद असायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading