अरुण जेटली यांच्यासमोरची आव्हानं

अरुण जेटली यांच्यासमोरची आव्हानं

येत्या आर्थिक वर्षात विकास दर ७ ते ७.५ टक्के राहील...आणि भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील, असा आशावाद आर्थिक पाहणी अहवालात सरकारनं व्यक्त केलाय.

  • Share this:

01 फेब्रुवारी : आर्थिक पाहणी अहवालावर नजर टाकली तर आगामी अर्थसंकल्पात काय असू शकतं याचा अंदाज येतो. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासमोरची आव्हानं काय आहेत ?

येत्या आर्थिक वर्षात विकास दर ७ ते ७.५ टक्के राहील...आणि भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील, असा आशावाद आर्थिक पाहणी अहवालात सरकारनं व्यक्त केलाय.

त्याचवेळी कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे, या वास्तवावरही बोट ठेवण्यात आलंय.

काय सांगतो आर्थिक पाहणी अहवाल ?

1. GST मुळे अप्रत्यक्ष करदात्यांच्या नोंदणीत 50% वाढ झाली. GST नोंदणीधारकांची संख्या 98 लाख. करप्रणालीपेक्षा (tax regime)3.4 टक्क्यांची वाढ. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडूत GSTमध्ये सर्वाधिक नोंदणीधारक...

2. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ३.२ टक्के राहील.

3. आर्थिक विकासासाठी बचत खात्यातल्या वाढीपेक्षा गुंतवणूक वाढण्याची जास्त गरज आहे.

4. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाचा निर्यातीतला वाटा 70%.

5. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास २.१ टक्के राहील.

6. पुरुषांनी शहरांकडे स्थलांतर केल्यानं शेतीमध्ये महिलांची संख्या वाढली.

7. कापड उद्योगाला मदतीचं पँकेज दिल्यानं तयार कपड्यांची निर्यात वाढली.

8. मुलगाच हवा हा भारतीयांचा अट्टाहास

9. भारतानं ज्ञानाचा ठोक उत्पादक व्हायला हवं.. ठोक ग्राहक नाही...

उद्याचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावरचा पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. एकीकडे तेलाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था काबूत ठेवण्याचं आव्हान...तर दुसरीकडे करदाते, महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक यांच्या अपेक्षा...याचा समतोल अरुण जेटली कसा ठेवतात, ते उद्या कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 09:57 AM IST

ताज्या बातम्या